भद्रावती : स्थानिक विवेकानंद महाविद्यालय भद्रावती येथे संस्था अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान यांच्या प्रेरनेने सांस्कृतिक विभागामार्फत स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती व्याख्यानस्वरूपी कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्साहात साजरी करण्यात आली.
. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुधीर आष्टुनकर यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या जयंती तसेच पुण्यतिथी दिनी त्यांचे कार्य माहिती करून घेऊन स्पर्धा परीक्षेत यश मिळवावे असे विचार व्यक्त केले. सदर कार्यक्रमाला प्रमुख वक्ता प्रा. रेणुका चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर भाषण दिले. विद्यार्थ्यांनी महात्मा फुलेंचे कार्य आणि त्यांची तळमळ लक्षात घेऊन, आपले जीवन यशस्वी बनविण्याचा प्रयत्न करावा. असे विचार त्यांनी व्यक्त केले.
. याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक तथा समन्वयक सांस्कृतिक विभाग प्रा. अमोल ठाकरे यांनी प्रास्ताविक भाषण दिले. कार्यक्रमाचे संचालन बी. ए. भाग दोन ची विद्यार्थिनी अंजली इंगोले नी तर आभार प्रा. श्रीकांत दाते यांनी मानले. सदर कार्यक्रमाला वरिष्ठ तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद, प्राचार्य, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग तसेच विध्यार्थी आदी बहुसंख्येने हजर होते.


