Home चंद्रपुर जिल्हा विशेष अवैध रेती ची वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त

अवैध रेती ची वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त

972

सिंदेवाही : तालुक्यामध्ये चोरीच्या रेतीचा चांगलाच धुमाकूळ सुरू असून तहसील कार्यालयाने रेती तस्करांचा बंदोबस्त करण्यासाठी चांगलीच पाऊले उचलली आहेत. याकरिता महसूल विभागाने पोलीस विभागाच्या सहकार्याने भरारी पथक स्थापन केले आहे. याच भरारी पथकाने सिंदेवाही तालुक्यातील खातगाव येथे शुक्रवारी रात्री 1.30 वाजता रेतीची अवैध्य वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त केला असल्याने रेती तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

.      तहसील कार्यालयात तयार केलेल्या भरारी पथकास गस्ती दरम्यान खातगाव येथील उमा नदी घाटामध्ये लाल रंगाचा महिंद्रा कंपनीचा विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर आणि क्रमांक नसलेली रेती भरलेली ट्राली आढळून आली. सदर वाहन थांबवून वाहनाचे निरीक्षण केले असता त्यामध्ये 1 ब्रास रेती आढळून आली. पथकाने ट्रॅक्टर चालकाकडे रेती परवान्याबद्दल विचारणा केली असता कोणताही वैध परवाना नसल्याचे चालकाने सांगितले. त्यामुळे अवैध रेती वाहतूक करत असल्याने ट्रॅक्टर सिंदेवाही तहसील कार्यालयात जमा करण्यात आला असुन सदर ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी सिंदेवाही तहसीलदार यांनी उपविभागीय अधिकारी चिमूर यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे.

.       सदर कारवाई तहसीलदार संदीप पानमंद यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार मंगेश तुमराम, महसूल सेवक तुलसीदास गेडाम, शिपाई चक्रधर गेडाम आणि पोलीस कर्मचारी नारायण येग्गेवार यांनी केली आहे.

error: Content is protected !!