Home शैक्षणिक जनता विद्यालय नेरीचे 6 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

जनता विद्यालय नेरीचे 6 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

995

उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम

नेरी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या नॅशनल मेरिट कम मीन्स स्कॉलरशिप परीक्षा 2024-25 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये लोक कल्याण शिक्षण मंडळ नेरी द्वारा संचालित जनता विद्यालय नेरी चे 6 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.

.      आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेणे तसेच त्याला बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करता यावे, यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालय, नवी दिल्लीमार्फत ही शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांस 9 वी पासून समोर 5 वर्ष, प्रत्येक वर्षाला 12 हजार. याप्रमाणे 60 हजार रुपये स्कॉलरशिप देण्यात येते. सदर परीक्षेत जिल्ह्यात जनरल मधून नेरी येथील जनता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दुसरे नंबर घेऊन प्राविण्य प्राप्त केले आहे.

.      सदर परीक्षेत जनता विद्यालय येथील परीक्षेला45 विद्यार्थी बसले होते. बसलेल्या विद्यार्थ्यांमधून 6 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी 6 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. यामध्ये शर्वरी विनोद कामडी, गायत्री विनोद कामडी, अनुष्का मुरलीधर बानकर, शौर्या प्रवीण वाघे, डुलाशा किशोर कामडी, अनुष्का धनराज पिसे या सर्व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापक सुरेश येरणे सहाय्यक शिक्षक बांबोळे शिक्षिका वाघमारे, सा शिक्षक पडोळे, चौधरी, संदेश पंधरे तसेच आईवडील आणि सर्व मार्गदर्शक शिक्षक यांना दिलेले आहे.

error: Content is protected !!