Home सामाजिक चिमूर तालुक्यात वन अकादमी तयार करण्यात यावी 

चिमूर तालुक्यात वन अकादमी तयार करण्यात यावी

1009

आ. भांगडिया यांची वनमंत्र्यांकडे मागणी

चिमूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या चिमूर तालुक्यात वन अकादमी तयार करण्यात यावी तसेच विधानसभा क्षेत्रातील समस्याच्या निराकरण संदर्भात चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांच्या सूचनेनुसार दिनांक 2 एप्रिल रोजी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

.     आमदार बंटी भांगडिया यांनी चिमूर तालुक्यात तीन कोअर व आठ बफर पर्यटन गेट आहेत. परंतु मुख्यालय चंद्रपूर असल्याने प्रशासकीय अडचण निर्माण होत असल्यामुळे चिमूर येथे उपवनसंरक्षक दर्जाचे अधिकारी कार्यालय चिमूर येथे सुरु करण्याची मागणी आमदार भांगडिया यांनी वनमंत्री नाईक यांचे कडे केली तसेच चिमुर तालुक्यातील बहुतांश भाग वनालगत असल्याने शेतकऱ्यांना जंगली जनावरांमुळे शेतपिकाच्या नुकसानीचा सामना करावा लागतो याकरिता वन्यप्राणी भ्रमण क्षेत्रातील शेत्यांना चेनलिंक फेसिंग तारेचे कुंपण घालून जंगली श्वापदांचा बंदोबस्त करण्याची मागणी सुद्धा केली.

.      चिमूर तालुक्यातील पर्यटन गेट मधून देश विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने दरवर्षी पर्यटणाचा आनंद लुटण्या साठी येत असतात तसेच चिमूर तालुक्यातील पर्यटन गेट हे नागपूर वरून अगदी शंभर किमी अंतरावर आहे त्यामुळे चंद्रपूर पेक्षा चिमूर तालुक्यातील पर्यटन गेट ला पर्यटकांची पहिली पसंती असते त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक पर्यटक चिमूर तालुक्यात येत असतात. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर या पर्यटन गेटचे नाव दिवसेंदिवस प्रसिद्ध होत आहे त्यामुळे या सर्व गेट वर राष्ट्रीय स्तरावरील सोई सुविधा उपलब्ध होण्यासाठी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांनी अनेक दिवसा पासून सतत पाठपुरावा सुरु ठेवला होता.

.      अखेर दिनांक 2 एप्रिल रोजी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत संबंधित विषयावर चर्चा करण्यात आली तसेच चिमूर तालुक्यातील विविध पर्यटन गेट च्या समस्याचे लवकरच निराकरण करून मार्गी लावण्याचे तसेच जंगली श्वापदांपासुन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने उपाययोजना प्रस्ताव सादर करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले व  आमदार भांगडिया यांना त्यांनी उपस्थित केलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आश्वस्त केले. या बैठकीत वन विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या सह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!