सिंदेवाही येथील घटना
सिंदेवाही : पॅथॉलॉजी मध्ये रक्ताची तपासणी करून पार्किंग मधील दुचाकी काढून घराकडे जाण्याच्या तयारीत होते. पत्नी दुचाकीवर बसण्या पूर्वीच पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रक ने डॉ.प्रेमकुमार खोब्रागडे यांच्या दुचाकीला धडक दिली . आणि ते ट्रक खाली चिरडल्या गेले. पत्नीच्या डोळ्यादेखत डॉ. खोब्रागडे यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी १२ वाजता सिंदेवाही येथील महाजन इंडेन गॅस एजन्सी समोर घडली.
. फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील अग्रणी आणि कणखर नेतृत्व, संविधानाचे अभ्यासक, झाडीपट्टीत प्रसिद्ध असलेल्या भूक या नाटकाचे लेखक डॉ. प्रेमकुमार खोब्रागडे ( ५५) यांचे गुरुवारी दुपारी १२ वाजता सिंदेवाही येथील महाजन इंडेन गॅस एजन्सी समोर ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू झाला असल्याने आंबेडकरी समाजावर अवकळा पसरली आहे.
. प्राप्त माहिती नुसार गुरुवारी त्यांची तब्येत बरी नसल्याने ते आपल्या पत्नीसोबत रक्ताची तपासणी करण्यासाठी पॅथालोजी मध्ये गेले. आणि तपासणी करून आपली दुचाकी गाडी काढून पत्नीला घेऊन घराकडे जाण्यास निघाले. परंतु पत्नी गाडीवर बसण्या पूर्वीच पाठीमागून येणाऱ्या ट्रक ने डॉ.प्रेमकुमार खोब्रागडे यांच्या दुचाकीला धडक दिली. आणि ते ट्रक मध्ये दबल्या गेले. आणि त्यातच पत्नीसमोर त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर ट्रक पसार झाला. मात्र सिंदेवाही पोलिसांच्या सतर्कतेने सदर ट्रकला राजोली जवळ पकडण्यात आले. प्रेमकुमार खोब्रागडे यांचे प्रेताचे शवविच्छेदन करण्यात आले असून शुक्रवारी सकाळी ८ वाजता सिंदेवाही येथील स्मशानभूमीत त्यांचेवर अग्निसंस्कार करण्यात येणार आहे. डॉ. प्रेमकुमार खोब्रागडे यांचे निधनाने आंबेडकरी समाजाची खूप मोठी हानी झाली असून बहुजन समाजावर अवकळा पसरली आहे. त्यांचे पश्चात पत्नी, आणि दोन मुले आहेत.
आंबेडकरी चळवळीचा योद्धा हरपला डॉ. प्रेमकुमार खोब्रागडे हे गुंजेवाही येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे विषय शिक्षक म्हणून कार्यरत होते. दरम्यान त्यांनी झाडीपट्टी रंगभूमी साठी लेखन करून “भूक” या प्रसिद्ध नाटकासह ११ हस्तलिखित नाटके सुद्धा लिहिली आहेत. फुले शाहू आंबेडकरी चळवळी मध्ये अग्रणी राहून बहुजन समाजाच्या लढ्यासाठी त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे. अलीकडे त्यांनी समता सैनिक दल या विषयावर प्रबंध लिहून नागपूर विद्यापीठामध्ये पीएचडी केली आहे. संशोधनाचा गाढा अभ्यास, आणि आंबेडकरी विचार अंगिकारले असल्याने ते विदर्भातील एक प्रख्यात आंबेडकरी व्याख्याता म्हणून नावारूपास आले होते.


