Home सामाजिक सेल्फी स्पर्धा विजेत्यांना बक्षिस वितरण

सेल्फी स्पर्धा विजेत्यांना बक्षिस वितरण

998

मतदानाचा टक्का वाढीसाठी घेण्यात आली होती स्पर्धा

विसापूर बॉटनिकल गार्डनमध्ये पार पडला सोहळा

बल्लारपूर : चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दरम्यान मतदानाचा टक्का वाढीसाठी विविध उपक्रम राबविले होते. याच अनुषंगाने स्विप उपक्रमांतर्गत सेल्फी व विविध स्पर्धा पार पडल्या होत्या. यामध्ये जिल्ह्यातील ८ हजार ८0 स्पर्धकांनी आनलाईन स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील विजेत्यांना बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील श्रदेय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डनमध्ये एका शानदार सोहळ्यात गुरुवारी सन्मानित करण्यात आले.

.    या स्पर्धेतील विजेते ब्रम्हपुरी येथील शंकर भर्रे यांना बुलेट दुचाकी, सिंदेवाही येथील सोनल गभने यांना १५ ग्राम सोन्याचे नाणे, तर चिमूर येथील गीतेश मदनकर यांना मोबाईल प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी विसापूर येथील श्रदेय अटल बिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डनचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश झाडे, वनपाल आर. एस. यादव, आर. एस. शिवणकर, एम. ए. अनकाडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

.     चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक धर्तीवर विधानसभा निवडणूक दरम्यान मतदानाचा टक्का वाढावा. मतदान राष्ट्रीय कार्य म्हणून जागृती व्हावी, या अनुषंगाने चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने सेल्फी अपलोड आनलाईन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत जिल्हा भरातील ८ हजार ८0 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा निकाल जिल्हाधिकारी कार्यालय येथे २७ नोव्हेंबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे यांनी जाहीर केला होता.

error: Content is protected !!