Home चंद्रपुर जिल्हा विशेष नगरपालिकेचे घंटागाडी व स्वच्छता व्यवस्थापन कंत्राट नियमानुसार

नगरपालिकेचे घंटागाडी व स्वच्छता व्यवस्थापन कंत्राट नियमानुसार

1256

तन्वी आणि समता बचत गट चा दावा

भद्रावती : घंटागाडी व्यवस्थापन तसेच स्वच्छतागृहे व स्नानगृहांच्या साफसफाईचे कंत्राट नियमानुसार देण्यात आल्याचा दावा तन्वी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रंजना मोडक व समता बचत गटाच्या अध्यक्षा रुखसाना शेख यांनी पत्रकार परिषदेत केला.

.      मुख्य बचत गटातून १३ सदस्य निवडून भद्रावती उज्ज्वल नगर संघाची स्थापना करण्यात आली. अध्यक्षपदी अनिता शाहा, सचिवपदी रंजना मोडक आणि उपाध्यक्षपदी रुक्साना शेख यांची निवड झाली. न.प.भद्रावती मार्फत विविध बचत गटांना कंत्राटे दिली जातात. कोरोनाच्या काळात घरोघरी मास्क आणि झेंडे वाटण्याचे कंत्राटही आरोपकर्त्या महिला बचत गटांना मिळाले आहे. त्यामुळे त्यांनी केलेला आरोप निराधार आहे. असे त्यांनी पत्र परिषदेत स्पष्ट केले.

error: Content is protected !!