Home चंद्रपुर जिल्हा विशेष 65 वर्षीय वृद्ध महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

65 वर्षीय वृद्ध महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

1206

भद्रावती येथील घटना

भद्रावती : येथील एका 65 वर्षीय वृद्ध महिलेने आपल्या राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना शहरातील बंगाली कॅम्प,  नेताजी नगर येथे दिनांक 2 रोज बुधवार ला दुपारी 1 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. किरण मनोरंजन मंडल (65) असे मृतक वृध्द महिलेचे नाव आहे.

.      मृतक महिला व तिचा पती बंगाली कॅम्प येथे राहतात. घटनेच्या दिवशी पती बँकेत गेले होते. बँकेतून परत आल्यानंतर मृतक महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे  उघडकीस आले. मृतक  महिला ही आजाराने त्रस्त होती या आजाराला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे  समजते. सदर घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना  प्राप्त झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला.

error: Content is protected !!