कुटुंबावर उपासमारीची वेळ
मोहाडी : गावातील नागरिकांच्या दस्ताऐवजाबाबत महत्त्वाची कामे करणाऱ्या संगणक परिचालकांना मागील सहा महिन्यांपासून मानधनच मिळाले नसल्याची गंभीर बाब समाेर येत आहे. तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या परिचालकांच्या कुटुंबियांवर आता उपासमारीची वेळ आली आहे.
. शासनाच्या सर्व योजना प्रत्यक्ष सर्वसामान्य नागरिकांना एकच ग्रामपंचायत च्या छताखाली ग्रामपंचायत संगणक परिचालक उपलब्ध करून देत आहेत. त्याबरोबरच ग्रामपंचायत चे जमा खर्च, सर्व नमुने, जन्म मृत्यू दाखले, विवाह दाखले या सह सर्व नागरिकांना त्यांच्या दैनंदिन शासकीय तसेच शैक्षणिक कामासाठी आवश्यक असणारे दाखले सहज आनी सुलभ रीतीने उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्नरत आहेत. वेळोवेळी वरिष्ठ कार्यालया कडुन येणारे आदेश, अहवाल वेळोवेळी अद्यावत करून उपलब्ध करून देण्याची जवाबदारी देखील संगणक परिचलकास सांभाळावी लागते.
. एवढं सगळं करूनही संगणक परिचालक आणि कुटुंबियाची आर्थिक ससेहोलपट व्हावी यामुळे राज्यातील तमाम संगणक परिचालक यांच्यात तीव्र असंतोष दिसुन येत आहे. खरं तर भीक नको मात्र कामाचा निश्चित केलेला मोबदला एका निश्चित तारखेला मिळावा एवढीच मागणी संगणक परीचालकाकडून केली जात आहे.


