शिवसेनेची परिवहन मंत्र्यांना तक्रार
चंद्रपूर : शिवसेना चंद्रपूर येथील पदाधिकाऱ्यांनी चंद्रपूर बस स्थानकावर अचानक फेरफटका मारला असता चंद्रपूर बस स्थानक अस्वछतेच्या विळख्यात सापडल्याचे चित्र दिसून आल्याने चंद्रपूर बस स्थानकाची तक्रार थेट येथील परिवहन मंत्र्यांना करण्यात आली.
. शिवसेना सचिव व प्रवक्त्या मनीषा कायंदे व पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख किरण पांडव यांच्या सूचनेनुसार चंद्रपूर महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख प्रतिमा ठाकुर सह महिला पदाधिकारी तथा महानगर प्रमुख भरत गुप्ता, उपजिल्हाप्रमुख माया मेश्राम, शहर प्रमुख वाणी सदालावार, माजी नगरसेविका सीमा रामेडवार, उप शहर प्रमुख अंजु लेंगुरे, शैलेश सदालावार, सूचक दखणे, जफर बेग, तेजस गाणार, नयन जंगम सह कार्यकर्त्याची उपस्थित होती.
. चंद्रपूर बस स्थानक येथे अचानक पोहचले दरम्यान चंद्रपूर बस स्थानकावर महिलांच्या सुरक्षेते बाबत बस स्थानक कोणती पाऊले उचलतात याकडे शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधत बस स्थानकावरील महिला स्वछतागृह, उपहारगृह, हिरकणी कक्ष तसेच महिला कर्मचारी विश्रामगृह व मदद कक्षाची तपासणी केली असता स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. यामुळे महिला प्रवाशांची गैरसोय होत आहे. तिथे कोणतीही सोय सुविधा नसल्याचे दिसून आले या समस्यांकडे आगार प्रमुखांकडून लक्ष दिले जात नसल्याचा आरोप होत असून मूलभूत सुविधा तरी मिळाव्यात, अशी मागणी केली जात आहे. तर संपूर्ण अस्वच्छतेचा डोंगर महिला पदाधिकाऱ्यांनी दिसून आला. त्यांनी तात्काळ मनीषा कायंदे यांना माहिती देताच त्यांनी चंद्रपूर बस स्थानकाचा अहवाल परिवहन मंत्री यांच्याकडे पाठवण्यात आला.


