Home सामाजिक सिंदेवाहीत १७ मार्चला लोकशाही दिनाचे आयोजन

सिंदेवाहीत १७ मार्चला लोकशाही दिनाचे आयोजन

1094

सिंदेवाही : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून ‘लोकशाही दिन’ तहसीलदार, सिंदेवाही यांचे अध्यक्षतेखाली दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्या अनुषंगाने सिंदेवाही तहसील कार्यालय येथे १७ मार्च रोजी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तालुका प्रशासनाने दिली आहे.

.      लोकशाही दिनाचे अनुषंगाने जर तक्रारदरांची काही तक्रार असेल तर ती तक्रार विहित नमुन्यात १५ दिवस अगोदर २ प्रति मध्ये तक्रार अर्ज तहसील कार्यालय येथे सादर करावा. तसेच सादर करणारी तक्रार किंवा निवेदन हे वैयक्तिक स्वरूपात असावी. वैयक्तिक तक्रार नसेल तर तक्रार स्वीकारले जाणार नाही. तसेच तक्रारदाराला त्या तक्रारीचे उत्तर लोकशाही दिनानंतर एक महिन्याच्या आत किंवा शक्य तितक्या लवकर दिले जाईल. तक्रार अर्जाचा नमुना तहसील कार्यालय येथे विनामूल्य उपलब्ध असल्याची माहिती तहसीलदार संदीप पानमंद यांनी माध्यमांना दिली आहे.

.       १७ मार्च ला महिन्याचा तिसरा सोमवार येत असल्याने, या दिवशी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय, सिंदेवाही येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त तक्रारदारांनी लोकशाही दिनात सहभागी व्हावे. असे आवाहन तहसीलदार संदीप पानमंद यांनी केले आहे.

error: Content is protected !!