सिंदेवाही वनपरिक्षेत्रमधील कारगाटा येथील घटना
सिंदेवाही : वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय सिंदेवाही अंतर्गत उपवन क्षेत्र सिंदेवाही बीट कारगाटा कक्ष क्रमांक १३४४/७४६ मध्ये मंगळवारी दुपारी ३.३० चे दरम्यान वन औषधी साठी गेलेल्या शामराव अर्जुन मंगाम राह. जाटलापूर मोठा यांचेवर वाघाने हल्ला करून ठार केले असल्याची घटना बुधवारी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली आहे.
. सदर घटनेची माहिती प्राप्त होताच सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर, क्षेत्र सहाय्यक नितीन गडपायले, वनरक्षक राहुल धनविजय, कारगाटा अधिनिस्त वनपरिक्षेत्रातील कर्मचारी, तसेच आर आर यू पथक सिंदेवाही, घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांची अफाट गर्दी झाल्याने घटनास्थळी कोणतीही अनुचित घटना घडू नये. याकरिता सिंदेवाही पोलिस स्टेशन चे ठाणेदार विजय राठोड यांचे नेतृत्वात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
. घटनास्थळावरून आजूबाजूला चौकशी करून वाघाचे छायाचित्र मिळविण्यासाठी घटनास्थळाचा परिसरात ४ ट्रॅप कॅमेरे, आणि १ लाइव्ह कॅमेरा लावण्यात आला. यानंतर मृतकाच्या वारसानास तात्पुरती आर्थिक मदत करण्यात आली. सदर परिसरात क्षेत्रीय कर्मचारी, व आर आर यू सिंदेवाही, यांची दैनंदिन गस्त, व जनजागृती करणे, सुरू आहे. तसेच मानव वन्यजीव संघर्ष होऊ नये म्हणून सदर परिसरात पुन्हा गस्त वाढविण्यात आली आहे.


