Home सामाजिक रासेयो शिबिराच्या माध्यमातून आत्मविश्वास वाढतो

रासेयो शिबिराच्या माध्यमातून आत्मविश्वास वाढतो

1114

डॉ.राजेश इंगोले यांचे प्रतिपादन

विसापूर येथे एस.एन.डी.टी.च्या रासेयो शिबिराचे उदघाटन

बल्लारपूर : राष्ट्रीय सेवा योजना शिबीर ग्रामीण संस्कृती सोबत नाते जोडणारे आहे. यामुळे संस्कार रूजविण्यास मदत मिळते. हे व्यासपीठ म्हणजे व्यक्तीमत्व घडविण्यासाठी संधी आहे. यामुळे सहजीवनाचा परिचय होतो. शिबीर दरम्यान विविध उपक्रम राबविले जाणार आहे. खरे म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून आपला आत्मविश्वास वाढतो, असे प्रतिपादन एस. एन.डी.टी.महिला विद्यापीठ मुंबई अंतर्गत महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल बल्लारपूर चे संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी मंगळवारी विसापूर येथे केले.

.       एस. एन.डी. टी. महिला विद्यापीठ, मुंबई अंतर्गत महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल बल्लारपूर च्या वतीने विसापूर येथील राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा शिबीर आयोजित करण्यात आले आहे. २५ फेब्रुवारी पासून 3 मार्च दरम्यान चालणाऱ्या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

.       शिबीराचे उदघाटन बल्लारपूर येथील कला,वाणिज्य महिला महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.मनिष कायरकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई एस.एन. डी. टी. महिला विद्यापीठाचे संचालक डॉ. राजेश इंगोले होते, तर प्रमुख अतिथी म्हणून विसापूर येथील उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, सहाय्यक कुलसचिव डॉ. बाळू राठोड, समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त, कार्यक्रम अधिकारी प्रा.खुशबू जोसेफ यांची उपस्थिती होती.

.     यावेळी डॉ. मनिष कायरकर म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजना शिबीर श्रम संस्कार शिकवणारे आहे. मन,मतिष्क व मनगटाला चालना देण्यासाठी उपयुक्त आहे. ग्रामीण भागात नाते वाढविणारे आहे. आपल्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी मदत करणारे आहे.याचा संकोच न बाळगता, मनसोक्त आनंद घ्या. येथील शिबिराच्या आठवणी जतन करून ठेवा, असे डॉ. कायरकर यांनी मनोगत व्यक्त करताना शिबीरार्थी स्वयंसेवकांना सांगितले. प्रास्ताविकातून प्रा.खुशबू जोसेफ यांनी शिबीर आयोजनाची भूमिका विषद केली. ‘युथ फार माय भारत,’व’ युथ फार डिजिटल लिटरसी’ या विषयावर विविध उपक्रम शिबिराच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. संचालन यावेळी शिबीरार्थी स्वंयसेवकांची व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिति होती.

error: Content is protected !!