Home चंद्रपुर जिल्हा विशेष शेतीचे हंगाम संपल्यावरच मिरची सातरे सुरू करा

शेतीचे हंगाम संपल्यावरच मिरची सातरे सुरू करा

1134

शेतकर्‍यांचे ग्रामपंचायतला साकडे

नेरी : येथे मिरची सातरे सुरू झाल्याने गावातील मजूर मोठ्या प्रमाणात मिरची च्या मुक्या तोडण्यासाठी मिरची सातऱ्यावर जात असल्याने शेत कामासाठी शेतकर्‍यांना मजूर मिळत नाही. परिणामी शेतीची कामे थंडबस्त्यात पडली असून कापूस, लाख, हरभरा, जवस आदींसह अनेक पिकांच्या काढणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतात पिके पडली आहेत तसेच उन्हाळी भात पिकांच्या रोवणीला सुद्धा मजूर मिळत नसल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत असल्याने शेतकर्‍यांनी ग्रामपंचायत प्रशासनास निवेदन सादर करीत शेतकऱ्यांचे हंगाम पूर्ण होई पर्यंत मिरची सातरे बंद करावी अशी मागणी केली आहे.

.    शेतकर्‍यांनी रब्बी हंगामात अनेक पिकांची लागवड केली. यात गहू, हरभरा, लाख, सोयाबीन, जवस तसेच खरीप हंगामातील अनेक पिकांची लागवड केली. जानेवारी, फरवरी या महिन्यात हे सर्व पिकांचे उत्पादन होते. मात्र मजूर उपलब्ध होत नसल्याने सदर पिके ही धोक्यात आली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याला बाहेरील मिरची कंपनीने लावलेले मिरची सातरे जवाबदार असल्याचे बोलले जात आहे याचं सातऱ्यावर सर्व मजुरवर्ग महिला पुरुष कामाला जातात आणि मिरच्या खुडतात, 10 ते 15 रुपये किलोप्रमाणे मिरची खुडण्याचा दर असतो त्यामुळे बसल्या जागेवर रोजगार मिळत असल्याने मजूर या मिरची सातऱ्याकडे वळला आहे मात्र या अगोदर सदर मिरची सातरे मार्च महिन्यानंतर सुरू व्हायचे पण या वर्षी मिरची कंपनीने जानेवारीपासून सुरू केल्याने शेतकरी वर्गावर मजूर मिळत नसल्याने संकट निर्माण झाले आहे तेव्हा शेतीची संपूर्ण कामे झाल्यावर सदर सातरे सुरू करावे अशी मागणी शेतकरी वर्गांनी निवेदन ग्रा प नेरीला सादर केले आहे.

error: Content is protected !!