सिंदेवाही महसूल विभागाची कारवाही
सिंदेवाही : तालुक्याच्या महसूल विभागाने रेती तस्करांच्या विरोधात एल्गार पुकारला असून याच पार्श्वभूमीवर सकाळच्या सुमारास सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरातील टेकरी तुकुम या गावा जवळच असलेल्या नाल्यातून अवैधरीत्या रेतीचा उपसा करून ट्रॅक्टरने नेत असल्याची तहसील कार्यालय सिंदेवाही येथे माहिती मिळताच घटनास्थळी जावून सदर ट्रॅक्टर जप्त करण्यात आला असून सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालय येथे लावण्यात आला आहे.
. सध्या सिंदेवाही तालुक्यातील चारही जिल्हा परिषद सर्कल मध्ये रेती तस्कर रेतीची चोरी करून अवैध्य वाहतूक करीत आहेत. रेती तस्कर महसूल विभागाच्या हातावर तुरी देऊन आजही रात्रभर रेतीची वाहतूक करीत असल्याने महसूल विभागाच्या समोर मोठे आव्हान उभे झाले आहे. अशातच तहसीलदार संदीप पानमंद यांनी रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी रेती तस्करांवर धडक कारवाही करणे सुरू केले आहे. दरम्यान सोमवारी रात्री गुंजेवाही परिसरात टेकरी गावालगत असलेल्या नाल्यातून रेती काढत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त होताच सिंदेवाही तहसीलदार संदीप पानमंद यांच्या आदेशान्वये स्थानिक नायब तहसीलदार मंगेश तुमराम यांनी घटनास्थळी पोहोचून ट्रॅक्टर ट्राली ही विना क्रमांक असलेली रंगेहात पकडून रेतीने भरलेले ट्रॅक्टर जप्त केले. आणि सिंदेवाही तहसील कार्यालयात जमा केले आहे. अवैध रेती उत्खनाला आळा घालण्याकरिता सकाळच्या वेळी महसूल विभागाच्या वतीने गस्त करण्यात येत आहे. या दरम्यान अवैधरित्या रेतीचा उपसा करून ट्रॅक्टरने वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती देण्यात आली होती. त्यानुसार सिंदेवाही नायब तहसिलदार मंगेश तुमराम व तलाठी सुनील गुंजाळ हे दोघेही सकाळी ८ वाजताच्या सुमारास गुंजेवाही जवळील टेकरी तुकुम गावालगत असलेल्या रोडवर सदर अवैध रेतीने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली पकडले व ट्रॅक्टर – ट्राली सिंदेवाही तहसील ला जमा केला असून पुढील दंडात्मक कारवाईसाठी उपविभागीय अधिकारी चिमूर यांच्याकडे रेती भरलेल्या ट्रॅक्टर वाहन मालकावर दंडात्मक कारवाई करावे असा प्रस्ताव पाठवीला असल्याची माहिती सिंदेवाही तहसीलदार संदीप पानमंद यांनी दिली आहे.


