अंदाजपत्रका नुसार काम होत नसल्याचा ठपका
नेरी : येथे रस्ते विकासाची कामे सुरू असून पिएचसी चौकातील रस्ता बनवून बाजार चौकातील रस्ता बनविण्याचे काम झपाट्याने सुरू होते. मात्र एक पदरी रस्ता ऐका खासगी कंत्राटदार कंपनी ने बनवायला सुरवात केल्याने सदर काम अंदाजपत्रका नुसार होत नसल्याचा ठपका ठेवीत ग्रामपंचायत प्रशासनाने रस्ता बांधकाम थांबवित कंत्राटदाराला अंदाजपत्रक ची मागणी केली मात्र सदर अंदाजपत्रक हे सार्वजनिक बांधकाम येथे असल्याने अभियंता दाखवील असे उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे कामात गैरप्रकार असावा असा अंदाज आल्याने तात्काळ काम थांबविण्यात आले तसेच सदर रस्ता बांधकाम हे दोन पदरी असल्याने मात्र काम एक पदरी सुरू असल्याने नागरिक तसेच ग्रा प प्रशासन अचंबीत झाले त्यामुळे तात्काळ रस्ता बांधकाम बंद करण्यात आले.
. नेरी येथील मुख्यप्रवेश द्वार पीएचसी चौक ते बाजारचौक पर्यंत दोन पदरी सिमेंट कांन्क्रीट रस्त्याचे बांधकाम सुरू झाले यावेळी त्याच प्रकारचे अंदाजपत्रक असल्याची नागरिकांची चर्चा सुरू होती सदर काम व्यवस्थित सुरू असल्याने नागरिकांनी या कामाचे स्वागत केले अर्ध्या मार्गापर्यंत दोन पदरी काम करून कंत्राट कंपनीने त्या ठिकाणी काम थांबवून बाजार चौकात एक पदरी काम करायला सुरुवात केली त्यामुळे नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच ग्रा प प्रशासन आणि नागरिकांनी तात्काळ काम थांबवून कंत्राटदाराला अंदाजपत्रकाची मागणी केली मात्र सदर अंदाजपत्रक बांधकाम विभागात असल्याचे सांगून अभियंता यांना फोनवरून संपर्क साधल्याचे बोलले असता अभियंताने ग्रा प प्रशासनाला चिमूर येथील कार्यालयात बोलविले असल्याची माहिती आहे त्यामुळे ग्रा प प्रशासनाने सदर बांधकाम थांबविले या बांधकामाने बाजार चौकात येणारे वाहन एकच येऊ शकते दुसरे येऊ शकत नाही तसेच एक पदरीने अपघात घडू शकते ,सध्या या एकपदरी मार्गाने बस बंद झाली आहे तसेच अनेक वाहने बाहेर थांबित आहेत सदर मार्ग उंच झाल्याने बाकी परिसर हा खाल झाला आहे या मार्गाने चारचाकी वाहन वळवणे कठीण होणार असल्याने नागरिकांनी सदर मार्ग थांबविले तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाचे या कडे दुर्लक्ष असल्याचे ठपका नागरिकांनी ठेवला असून दोनपदरी मार्ग बनवावे अन्यथा मार्ग बनवू नका असे नागरिक बोलीत आहेत.


