Home सामाजिक क्रांतीभूमीत श्रीहरी बालाजी महाराजांची नगर परिक्रमा

क्रांतीभूमीत श्रीहरी बालाजी महाराजांची नगर परिक्रमा

1122

397 वर्षापासूनची परंपरा

लाखो भक्तांची होती उपस्थिती

आशिष गजभिये 

    चिमूर : येथील बालाजी महाराज मंदिराला व घोडा यात्रेला ३९७ वर्षाच्या इतिहासाची परंपरा आहे. श्री बालाजी महाराज मंदिराला महाराष्ट्राचा तिरुपती बालाजी म्हणून ओळखले जाते. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत चिमूर येथे श्रीहरी बालाजी महाराज देवस्थान हे अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान ठरले आहे तर विदर्भातील भाविकासाठी चिमूरची घोडा रथयात्रा श्रद्धेसह आकर्षण ठरत आहे. ही यात्रा सलग पंधरा दिवस चालत असून वसंत पंचमीला यात्रेला सुरुवात झाली आहे. यात्रेसाठी विदर्भातील लाखो भाविक हजेरी लाऊन दर्शन घेतात. शहराच्या मुख्य मार्गावर परिक्रमा काढण्यात आली. यात लाखो भक्तांची उपस्थिती होती.

.      श्रीहरी बालाजी महाराज मंदिराचा इतिहास हा 397 वर्षापूर्वी पासुनचां आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील तिरुपती बालाजी महाराज म्हणून ओळकल जाते.हे स्थळ अनेक राज्यांतील लोकांना भक्तिस्थळ बनले आहे. 2 फरवरी पासून सुरू झालेली ही यात्रा 15 दिवस चालणार दररोज इथे लाखो लोक हजेरी लावतील. जानोजी भोसले ने पेशव्यांचे प्रमुख देवाजी पंत चोरघडे यांच्या सांगण्यावरून सन 1750 मध्ये 200 एकर जमीन दान स्वरूपात दिली होती. चार भिंतीच्या या मंदिरात एक उंच प्रवेशद्वार आहे. जाचे वर नशिदर काम केले आहे. लाकडाच्या सभागृहात 12 स्तंभ आहेत त्यावर हत्ती, वाघासारखा प्राण्यांचे चित्र कोरलेले आहेत. त्याच्या समोर चार खांभ वाला एक मंडप आहे. श्रीहरी बालाजीची मूर्ती ही तिरुपती बालाजी मूर्ती समान आहे. मंदिर परिसरात एक गरुड स्तंभ आहे.बाहेर काही साधू संतांच्या समाधी आहेत.मिती माघ दशोदयी रात्री 12 ते सकाळी 5 वाजे पर्यंत लाकडी घोड्याच्या रथावर बालाजी महारांची प्रतिमा विसर्जित करून शहराच्या मुख्य मार्गाने परिक्रमन करते. याला घोडायात्रा संबोधित केल्या जाते.या विविध राज्यातील लाखो लोक संबोधित केल्या जाते.

घोडायात्रा निमित चिमूर महोत्सव                                                                                                                                                     घोडायात्रेच्या निमित्ताने मागील वर्षीपासून संयोजक आमदार किर्तिकुमार भांगडीया व घोडायात्रा महो्सव समिती वतीने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या वर्षी सुप्रसिद्ध गायिका इशरत जहान यांचा रोड शो, सुप्रसिध्द गरबा गायिका गीताबेन रबारी यांचा लाईव्ह कार्यक्रम, सुप्रसिध्द गायक हंसराज रघुवंशी यांचा कार्यक्रम, सुप्रसिध्द डान्सर वैभव घुगे, सौम्या कांबळे यांचा उपस्थितीत नॅशनल लेव्हल डान्स चॅम्पियनशिप आणि सुप्रसिद्ध कवी डॉ. कुमार विश्वास कवी समेलन आयोजित करण्यात आले आहे.

error: Content is protected !!