Home चंद्रपुर जिल्हा विशेष अपघात रोखण्यास बनविण्यात आलेले गतिरोधक ठरत आहे अपघातास कारणीभूत

अपघात रोखण्यास बनविण्यात आलेले गतिरोधक ठरत आहे अपघातास कारणीभूत

1147

वरोरा : तामिळनाडू राज्यातील वरंगल येथून प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी निघालेल्या एसयुव्ही कारला मागून येणाऱ्या मारुती सुझुकी कारने जबर धडक दिल्याची घटना येन्सा गावाजवळ गुरवारी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान घडली. सदर अपघात येन्सा गावाजवळील गतिरोधकावर वेग कमी करताना घडला.

.     नागपूर-चंद्रपूर मार्गावरील येन्सा गावाजवळ गतिरोधक तयार करण्यात आले. या गतिरोधकामुळे अपघात रोखता येईल असा उद्देश होता. मात्र हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने वाहन चालक धूम ठोकत वाहने हाकलताना दिसून येत आहे. येन्सा या गावाजवळ गतिरोधक देण्यात आले, मात्र हे गतिरोधक नव्याने येणाऱ्या वाहन धारकास माहित नसल्यामुळे व अतीवेगात असलेल्या वाहन चालकाच्या लक्षात येत नसल्याने दररोज किरकोळ अपघात होत आहे. गुरवारी तामिळनाडू राज्यातील वरंगल येथून प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी निघालेल्या एसयुव्ही गाडी क्रमांक टीएस 03 ईयू 7299 च्या चालकाला अचानक गतिरोधक दिसले. त्यामुळे त्यांनी वाहनाचा वेग कमी केला असताना मागून येणाऱ्या मारुती सुझुकी एमएच 49 एई 3394 ने जोरदार धडक दिली. तर मागील काही दिवसा अगोदर ऊस तोड मजूर घेऊन जाणाऱ्या ऑटोला मागून येणाऱ्या कार ने जोरदार धडक दिल्याने ऑटो मधील काही महिला घटनास्थळीस ठार झाल्या तर काही गंभीर जखमी झाल्या होत्या.

error: Content is protected !!