आ. बंटी भांगडिया यांच्या मार्गदर्शनात महाशिवरात्री महोत्सव समितीचा पूढाकार
26 फेब्रुवारी ते 06 मार्च पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल
नागभीड : येथील महाशिवरात्री यात्रेला 200 वर्षे जुनी परंपरा असून नागभीड येथील महाशिवरात्री उत्सव समिती या महोत्सवासाठी सज्ज झालेली आहे. काल चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये नियोजनात्मक बैठक पार पडली.
. या बैठकीला विविध सेवाभावी संस्था, व्यापारी संघ, पत्रकार संघ, महिला संघटना, गणपती उत्सव मंडळ, शारदा- दुर्गा उत्सव मंडळ यांचे पदाधिकारी व नागभीडकर उपस्थित होते. दरवर्षी प्रमाणे महाशिवरात्रीला पूर्ण विदर्भातून या ठिकाणी भाविक भोलेनाथाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. या महाशिवरात्री यात्रेला महोत्सवाचे स्वरूप यावे यासाठी आमदार बंटी भांगडिया स्वतः पुढाकार घेत असून यावर्षी सुद्धा अनेक दर्जेदार संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे…यात शनिवार 1 मार्च रोजी कॉमेडी अभिनेते सुनील पाल, एहसान कुरेशी, कॉमेडीयन व्ही.आय.पी. गौरव मोरे, वनिता खरात यांच्या कॉमेडी शो चे आयोजन करण्यात आले आहे या प्रसंगी उदघाटन कार्यक्रमाला आम. भांगडिया उपस्थित राहणार आहेत.. रविवार 02 मार्च रोजी भव्य प्रसिद्ध गायिका पलक मुच्चल व पलाश मुच्चल ह्यांचा गायनाचा लाईव्ह कॉन्सर्ट चे आयोजन करण्यात आले आहे.. तर सोमवार 03 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय गरबा गायिका गीताबेन रबानी यांचा लाईव्ह कॉन्सर्ट गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तर मंगळवार 04 मार्च रोजी नॅशनल लेव्हल डान्स प्रतियोगितेचे आयोजन करण्यात आले आहे.
. ‘उत्सव कलावंताचा, महोत्सव नागभीडकरांचा 2025’ या महोत्सवाची टॅग लाईन असून हे सर्व कार्यक्रम शिवटेकडीच्या पायथ्याशी श्रध्येय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी शिवटेकडी लॉन या ठिकानी होत आहे.. या ठिकाणी 20 टे 25 हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा भाविक जनतेने सहकार्य करून या उत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन आमदार बंटी भांगडिया यांनी भाविकांना केले आहे. महाशिवरात्री उत्सवाचा सर्व भाविकांनी लाभ घेण्याचे भाजपा महामंत्री व माजी जि.प.सदस्य संजय गजपुरे सह अन्य भाजपा पदाधिकारी यांनी केले आहे.


