Home सामाजिक शिवराज्य वाहतूक सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी गुलाम गौस 

शिवराज्य वाहतूक सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी गुलाम गौस

1157

वरोरा : चंद्रपूर जिल्ह्यात औद्योगिकीकरणाचे जाळे पसरले असून येथील अनेक कंपन्या वाहतूकदार वाहतुकीकरिता आपला व्यवसाय करीत आहे. मात्र जिल्यातील स्थानिक नागरिकांना वाहतुकीसाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या वाहतूकदारांच्या  समस्याचे निवारण करण्याकरिता सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाने गुलाम गौस अब्दुल हमीद सिद्दिकी यांची शिवराज्य वाहतूक सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

.      शिवसेनेचे प्रमुख नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  शिवराज्य  वाहतूक सेनेचे शिवसेना लोकसभा गटनेते उपनेते, प्रमुख सल्लागार राहुल रमेश शेवाळे , किरण मिलिंद जाधव उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य  वाहतूक सेनेचे अध्यक्ष अब्दुल समद शेख यांच्या आदेशानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व वाहतूकदारांच्या  संमतीने गुलाम गौस अब्दुल हमीद सिद्दिकी यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. याबाबत मनिष भुसारी, शाहरुख पठाण, आलेख रट्टे, नितीन टेमुर्णे, शुभम ताकसांडे यांनी आभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!