बरडघाट येथील गावकऱ्यांची वन विभाग बफर झोनला मागणी
चिमूर : तालुक्यातील खडसंगी जवळील बरडघाट येथील शेतकऱ्यांची शेती ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला लागुन आहे. आता रब्बी पिकाचा हंगाम सुरू असुन शेत शिवारामध्ये वाघ, रामडुक्कर व इतर वन्य प्राणी शेत शिवारामध्ये फिरत आहे. वन्य प्राण्यांनी पिकांची नासधूस करू नये म्हणून शेतकरी रातदिवस जागल करीत आहेत. जागल करीत असताना भर दिवसाच वाघाचे दर्शन शेतकर्यांना होत आहे. त्यामुळं या वन्यप्राण्यांचा वन विभाग बफर झोन यांनी जंगला जवळील शेती सभोवताल तारेचे संरक्षण कुंपण करुन द्यावे यासह विविध मागण्यांचे निवेदन खडसंगी येथील बफर झोनचे वन परिक्षेत्र अधिकारी भारती राऊत यांना बरडघाट गावकऱ्यांच्या वतीने निवेदन दिले आहे.
. आता रब्बी हंगाम सुरू असून, शेतात चना, ज्वारी, कापूस, गहू, भाजीपाला उभी पिक असून, पिकाची रखवाली (जागल) करण्यासाठी म्हणून शेतकरी शेतामध्ये जात आहे. परंतु दिवस रात्र वाघ शेत शिवारामध्ये अधुन मधुन फिरत आहे. तरी त्या वाघाचे त्वरीत बंदोबस्त करण्यात यावे. जेणेकरून शेतक-यांच्या सोईचे होईल. एखादी अनुचीत घटना घडण्याचे नाकारता येत नाही. त्यामुळं वाघाचे त्वरीत बंदोबस्त करण्यात यावे. जर का वाघाचे बंदोबस्त केले नाही. व एखादी अनुचित घटना घडलीच तर याला सर्वस्वी वन विभाग जबाबदार असेल तसेच जंगल शेत सिमेवर जाळीचे कुंपन करून देण्यात यावे जेणेकरून वन्य प्राणी हे शेत शिवारामध्ये येणे-जाणे बंद होईल व त्यामुळे शेतक-यास काम करणे सोईचे होईल व शेतपिकाचे नुकसान होणार नाही. तसेच बरडघाट व पांढरपौणी हे दोन्ही गाव बफर झोनमध्ये मध्ये समाविष्ट करण्यात यावे.
. या अगोदर शासनाला बरडघाट व पांढरपौणी या दोन्ही गावांच्या वतीने निवेदन देण्यात आले. तरी याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. बरडघाट व पांढरपौणी हे दोन्ही गाव बफर मध्ये सामाविष्ट करून गावकऱ्यांना न्याय मिळवून द्यावे. अश्या आशयाचे बरडघाट येथील गावकऱ्यांच्या वतीने चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया, वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी यांना निवेदन देवून मागणी करण्यात आलेली आहे.
. यावेळी निवेदन देताना उपरपंच प्रमोद श्रीरामे, रोशन भोयर, अमृत बावणे, शंकर चनोरकर, नामदेव दोडके, ताराचंद चनोरकर, मनोहर सहारे, ऋषी घरत, कवडू बारेकर, सुनिता गेडाम, उषा दोडके, कौशल्या सहारे, माला भोयर, देवराव भोयर, सुशीला कामडी, घनश्याम कामडी, दशरथ सोनवणे, दुर्योधन दोडके, आदी गावकरी उपस्थित होते.


