Home चंद्रपुर जिल्हा विशेष अवैध रेतीची वाहतूक करताना ट्रॅक्टर पकडला

अवैध रेतीची वाहतूक करताना ट्रॅक्टर पकडला

1367

महसूल विभागाची कार्यवाही 

नेरी : अवैधरीत्या रेतीची वाहतूक करीत असताना एका ट्रॅक्टरला महसूल विभागाने पकडून कारवाई करत चिमुर तहसील कार्यालयात जमा करण्यात आला.

.     प्राप्त माहितीनुसार पळसगाव येथे अवैद्यरीत्या रेती घेऊन जात असताना तलाठी शुभम बदकी यांनी ट्रॅक्टर पकडून चिमूर तहसील कार्यालयात जमा करून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई चिमूर चे तहसीलदार श्रीधर राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पळसगाव साझ्याचे तलाठी शुभम बदकी, कोतवाल प्रदीप पाटील यांनी केली आहे. या कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे.

error: Content is protected !!