Home चंद्रपुर जिल्हा विशेष बल्लारपूर शहरातील मुख्य मार्गावरील अतिक्रमण तातडीने हटवा

बल्लारपूर शहरातील मुख्य मार्गावरील अतिक्रमण तातडीने हटवा

200

राष्ट्रवादी काँग्रेसची तहसीलदारांकडे मागणी

अपघातांचे प्रमाण वाढल्याने सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत झांमरे आक्रमक

प्रशासनाला दिले निवेदन

बल्लारपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेले शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बल्लारपूर शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. या अतिक्रमणामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, हे अतिक्रमण तातडीने हटवण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत झांमरे यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार महेंद्र फुलझेले यांना निवेदन सादर करण्यात आले.

.      बल्लारपूर शहरातील पेपर मिल वसाहतीपासून ते बामणी (दुधोली) गावापर्यंत राज्य महामार्ग गेला आहे. या मार्गावर दुभाजक असले तरी, रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. या मुख्य मार्गावरून जड वाहनांची सतत वर्दळ असते. अनेकदा जड वाहने रस्त्यावरच उभी राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. वाढत्या अतिक्रमणामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, अपघातात निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.

.      या गंभीर समस्येकडे नगर प्रशासन, राज्य महामार्ग प्राधिकरण आणि वाहतूक शाखा पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. प्रशासनाच्या या डोळेझाक धोरणामुळे सर्वसामान्यांचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर त्वरित तोडगा काढून मुख्य मार्गावरील सर्व अतिक्रमणे हटवावीत, अशी मागणी प्रशांत झांमरे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली आहे.

error: Content is protected !!