Home चंद्रपुर जिल्हा विशेष तेलंगणा एक्सप्रेसच्या धडकेत इसमाचा मृत्यू

तेलंगणा एक्सप्रेसच्या धडकेत इसमाचा मृत्यू

581

विसापूर रेल्वे स्थानक येथील घटना

रेल्वे मार्ग ओलांडताना घडला अपघात

बल्लारपूर : तालुक्यातील विसापूर येथील एक इसम खासगी दवाखान्यात उपचारासाठी रेल्वे मार्ग ओलांडून जात होता. दरम्यान बल्लारपूर कडून तेलंगणा एक्सप्रेस आली. रेल्वे येताना त्याच्या लक्षात आले नाही. परिणामी त्याचा रेल्वेच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ही घटना आज बुधवार ला दुपारी १२ वाजता विसापूर रेल्वे स्थानक जवळ घडली. रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव मोहनमुरारी अर्जून कोडापे (६४) रा. विसापूर, ता. बल्लारपूर असे आहे.

.      मोहनमुरारी हे घरून टेकडी भागातील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी जातो म्हणून बाहेर पडला. विसापूर गावाच्या माध्यमातून तीन रेल्वे मार्ग गेले आहेत. तो रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वे मार्ग ओलांडून जात होता. नेमक्या त्याच वेळी बल्लारपूर कडून तेलंगणा एक्सप्रेस धडधड करत आली. ध्यानीमनी नसताना मोहनमुरारी ला रेल्वेची जबरदस्त धडक बसली.यामध्ये त्याच्या शरिराच्या चिंधड्या झाल्या.

.      घटनेची माहिती होताच रेल्वे पोलीस व विसापूर चौकी चे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी त्याचा मृतदेह बल्लारपूर येथे ग्रामीण रुग्णालय हलविण्यात आला. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे. घटनेचा पुढील तपास रेल्वे पोलीस निरीक्षक पि. व्ही. शुक्ला, पि. के. यादव, विसापूर चौकीचे दीपक खरतडे, दीपक खरतडे, विजय मेंढे करत आहे.

error: Content is protected !!