Home चंद्रपुर जिल्हा विशेष धनगर समाजाचे टेमुर्डा येथे रास्ता रोको आंदोलन

धनगर समाजाचे टेमुर्डा येथे रास्ता रोको आंदोलन

570

वरोरा : तालुक्यातील टेमुर्डा येथे धनगर आरक्षण अंबलबजावणी संदर्भात आज दिनांक 1ऑक्टोबर 2025 रोज बुधवार ला सकाळी 10.30 वाजता रास्ता रोको आंदोलन आहे. धनगर समाजाची आरक्षण ची अंबलबजावणी करून धनगर समाजाला एसटी प्रवर्गा मध्ये समाविष्ट करणे, शेळ्या मेंढयाना चराईसाठी वनविभाग आरक्षित जागा देणे, अहिल्यादेवी होळकर महामेष योजना चालु करणे, यशवंतराव घरकुल योजनेचा लाभ मिळावा, अश्या विविध मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन आहे.

.       रास्ता रोको आंदोलन यशस्वी होण्यासाठी धनगर समाजातील युवकांनी शेकोडो संख्याने उपस्थित रहावे असे आव्हान धनगर समाज महासंघ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती, मल्हार सेना, अहिल्या महिला सेना, धनगर जमात वरोरा, धनगर कर्मचारी संघटना या विविध संघटनानी केले आहे.

.       नुकताच धनगर समाजाचे नेते दीपक बोऱ्हाडे याच्या नेतृत्वात जालना येथे धनगर आरक्षण अंबलबजावणी संदर्भात विराट महामोर्चा लाखोच्या संख्यने पार पडला त्याचे प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्र मध्ये 1 ऑक्टोबर ला बगायला मिळणार आहे. आरक्षण अंबलं बजवणी मिळाल नाही तर सरकारच्या मागे धनगर समाज कधीच उभा राहणार नाही अशे व्यक्तव महाराष्ट्र मधील समाजा नेत्याचे आहे.

error: Content is protected !!