Home चंद्रपुर जिल्हा विशेष कारच्या धडकेत १० वर्षीय बालकाचा मृत्यू

कारच्या धडकेत १० वर्षीय बालकाचा मृत्यू

847

सिंदेवाही पोलिस स्टेशन अंतर्गत पळसगाव जाट येथील घटना

सिंदेवाही : पोलिस स्टेशन सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या पळसगाव जाट येथे एका कार चालकाच्या भरधाव कारने १० वर्षीय अंशू साईनाथ लांजेकर या बालकाचा मृत्यू झाला असल्याची घटना सोमवारी दुपारी १२ वाजता पळसगाव जाट येथील बस स्टॉप वर घडली.

.      पळसगाव जाट येथील बस स्टॉप परिसरात एम एच ३४ ए ए ७७५७ या क्रमांकाच्या कार चालकाने आपल्या ताब्यातील कार भरधाव चालवित अंशू साईनाथ लांजेकर या १० वर्षीय बालकाला धडक दिली. त्याला उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे नेले असता, उपचारा दरम्यान अंशुचा मृत्यू झाला. मृतक अंशू लांजेकर यांचे नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिस स्टेशन सिंदेवाही येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी यांचे मार्गदर्शनात सिंदेवाही पोलीस करीत आहेत.

error: Content is protected !!