करोडो रुपयांची उलाढाल
महसूल व पोलीस प्रशासनाची चूप्पी
पद्माकर रामटेके
ब्रम्हपुरी : तालुक्यातील बेलगाव घाटावरून अवैध रेतीचे उत्खनन करून आंतरजिल्हात रेतीची तस्करी केल्या जात आहे. यातून रेती तस्करांनी करोडो रुपयाची माया जमविली आहे तर शासनाला लाखो रुपयाचा चुना लावल्या जात असतानाही महसूल व पोलीस विभाग मौन बाळगून असल्याचे चित्र दिसत आहे.
. ब्रह्मपुरी तालुका अवैध रेती तस्करीचा अड्डा बनला आहे. अवैध रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वर महसूल व पोलीस प्रशासनाचा वचकच राहिला नाही. परिणामी रेती तस्कर शासनाला लाखो रुपयांचा चुना लावत असल्याचे दिसून येत आहे. रेती तस्कर व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांमध्ये साठे लोटे असल्यामुळे अवैध्य गौण खनिज वाहतूक व उत्खननाला सुगीचे दिवस आले आहे अवैध रित्या रेतीचे तस्करी करणाऱ्या रेती तस्करांनी व संबंधित अधिकाऱ्यांची उच्च स्तरीय चौकशी लागलीच तर मोठ मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण चौकशी कोण करणार ? एकीकडे घरकुल धारकांना रेती देण्यासाठी प्रशासन कडून सामान्य नागरिकांना वेट अँड वाच अशी भूमिका वाठविते तर दुसरीकडे गोसेखुर्द च्या नावाखाली करोडो रुपयांची रेती तस्करीला प्रशासन पाठबळ देते ही ही बाब म्हणजे प्रशासनच प्रशासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविण्यासाठी कारणीभूत ठरतात दिसते. मात्र तस्करांचे हात मंत्रालयाच्या पायथ्यापर्यंत असल्याने चौकशी होणार काय? हा प्रश्न प्रश्नच असणार आहे.
. चिमूर विधानसभा क्षेत्रातील ब्रम्हपुरी तालुक्यातील बेलगाव, कोलारी अरेर नवरगाव, सोंदरी आदी गावा लागत वैनगंगा नदी वाहते. याच गावातील रेती घाटावर करोडो रुपयाची रेती नदीच्या पात्रात उपलब्ध आहे. यातील बेलगाव रेती घाटावर देखील मोठ्या प्रमाणात रेती साठा उपलब्ध आहे. याचाच फायदा घेत धनाढ्य मंडळी सक्रिय होऊन राजकीय वलयाचा आणि राजकीय दबाव तंत्र वापरून तसेच चांदा ते बांदा असे कनेक्शन असलेले आवेशी जीवन जाणणारे व विलाशी प्रवृत्तीचे अधिकाऱ्यांशी सेटिंग करून गोसेखुर्द च्या नावाखाली एक नव्हे तर पन्नास करोड रुपयांची रेती जिल्हा बाहेर मोठ्या प्रमाणात रेतीची अवैधरीत्या वाहतूक करून स्वतः मालामाल झालेत पण प्रशासनाला महसूल बुडवून करोडो रुपयाचा चुना लावल्या गेल्याची शक्यता नाकारता येत नाही.
. प्रशासनाची आणि तस्करांनी मिलीभगत एवढ्या टोकाची असते की खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं मग कधी स्टाक रेती वाहतुकीच्या नावाखाली तर कघी गोसेखुर्द कामासाठी असे सांगून परप्रांतातून आणलेल्या टीपी चा वापर ब्रम्हपुरी तालुक्यातील रेती घाटावर करून त्याच टीपीच्या आधारे रात्री अपरात्री पहाटे वैनगंगा नदी पात्रात अत्याधुनिक वाहने उतरवून नदीला पोखरूनओराबळून काढले आणि अवैध रित्या रेतीची वाहतूक जिल्हा बाहेर करायचा हा गोरखधंदा चिमूर विधानसभा क्षेत्रातील ब्रम्हपुरी तालुक्यातील नदी घाटावर पहावयास मिळत आहे. या भागात विशेषतः सत्तारुढ आणि विरोधी पक्षाचे स्थानिक नेते या अवैध रेतीच्या धंद्यात गुंतले असल्याचे दिसते. एकीकडे सरकार अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देते तर दुसरीकडे विविध पक्षाचे कार्यकर्ते आणि स्थानिक नेते त्या कायद्याची आदेशाची खिल्ली उडवून शासनानेच करोडो रुपयांचा महसूल बुडविले जात असल्याचे दिसते. या तस्करांना नेमका आशीर्वाद कुणाचा हा प्रश्न अनेकांना भेडसावत आहे.
. शासनाने बेलगाव व त्याक्षेत्राती ब्रम्हपुरी तालुक्यातील अन्य गावातील रेती घाटाची योग्य आणि सखोल चौकशी केली तर मोठ मोठे मासे गळाला लागू शकतात आणि इतक्या दिवसापासून प्रशासनाला हाताशी घेऊन मिळविलेल्या अवैध मार्गातून करोडो रुपयाची माया जमविनाऱ्यांची ही पोलखोल होऊन शासनाला आता पर्यंत बुडविलेला करोडो रुपयांचा महसूल वसूल करण्याची संधी मिळू शकते. पण ते कोण करणार ? चौकशीची मागणी करणारेच सेट होतात तर निवेदने शासनापर्यंत पोहचणार कसे. शासनाचा करोडो रुपयाचा महसूल वाचविनारा वाली कुणीच नसल्याने चौकशी होणार की नाही हे सांगता येत नाही. एकीकडे तस्करांना रेती चोरताना कोणतेच नियम लागू होत नाही त्यांना सर्व गुन्हे माफ असतात तर दुसरीकडे प्रामाणिक पने अनेक सामान्य नागरिक घरकुल करिता संबंधित प्रशासनाकडे रेती ची मागणी करतात रीतसर अर्ज करूनही कार्यालयाच्या चकरा मारूनही रेती दिली जात नाही उलट आम्ही जेव्हा रेती जप्ती करू तेव्हा तुम्हाला देऊ असे उत्तरे मिळतात.
. मग तालुक्यातील संपूर्ण रेती घाटावरून अवैध रित्या रेतीची वाहतून होत असल्याची प्रशासनाला खरच कल्पना नाही का ? मग असेल तर निःपक्ष कृतीतून रोज कारवाई होते काय खरच एकही ट्रॅक्टर तुम्हाला मिळत नाही काय ? असे प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे.घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्यासाठी लोक प्रतिनिधींनी प्रयत्न करावे. ही देखील नागरिकांची अपेक्षा आहे. होत असलेल्या अवैध रेती चोरी प्रकरणाकडे जर लोक प्रतिनिधींनी या गंभीर बाबीकडे लक्ष दिल्यास चौकशी होऊ शकते. मात्र तसे होताना दिसत नाही.उलट बिनधास्त पने रेतीची चोरी होताना दिसत आहे. हे जरी खरं असलं तरी शासनाची आणि जनतेच्या विश्वासाची गरीमा राखण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे.
. जनतेचे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी आपला क्षेत्र सुजलान सुफलाम् व्हावा, शिक्षित व्हावा व देशाची सेवा करणारे निष्ठावंत कार्यकर्ते निर्माण व्हावे असा उद्देश असल्यास आणि आप आपल्या भागातील मग ते कोणत्याही पक्षाचे असोत त्या भागात तरुणांना अवैध धंद्याच्या कचाट्यातून बाहेर काढून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पावले उचलणे अपेक्षित आहे.


