गडचांदुर : परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रित्यर्थ स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन गडचांदुर येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात बीपी., शुगर, सीबीसी.,सिकलसेल इत्यादी आजाराची तपासणी करण्यात आली.
. या आरोग्य शिबिरामध्ये शुभांगी फुरटकर, सोनाली कडुकर, रश्मी कडुकर, सूरज चिमुरकर, गोलू ढोंगळे, संतोष छत्रेश्वर जिल्हा सिकॅलसेल समन्वयक चंद्रपूर आणि त्यांची टीम यांच्या मार्गदर्शनात ही तपासणी करण्यात आली. सुरवातीला या टीमच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले. त्यानंतर सक्षम खैरे, हस्ते, जितेश वाघमारे, प्रियांशु तोडे, श्रेयस ताकसांडे, रणवीर दुबे, राजू वाघमारे, राहुल निरंजने यांनी या वैद्यकीय तपासणी कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. आणि शिबिराला सुरवात करण्यात आली आली. कार्यक्रमाचे संचालन पद्माकर खैरे यांनी केले.


