तहसीलदार वरोरा यांचा आदेश
घरकुल लाभार्थ्याना आनंदाची वार्ता
चंद्रपुर : रेती अभावी घरकुलाचे काम सुरु न झालेल्या लाभार्थ्यांना जप्ती केलेल्या रेती साठा व अवैधरित्या रेतीची वाहतूक करणार्या वाहनावर कारवाई करून जप्त केलेली रेती घरकुल लाभार्थ्यांना देण्याचा आदेश वरोऱ्याचे तहसीलदार योगेश कौटकर यांनी काढला असून वरोरा तालुक्यातील 17 लाभार्थ्यांना प्रत्येकी तीन ब्रास रेती मोफत वितरित करण्यात आली. सदर रेती वाहून नेण्यासाठी लाभार्थ्यांना तहसील कार्यालयामार्फत झीरो रॉयल्टी पास दिल्या गेला असून यासाठी वेगवेगळे पथक नेमण्यात आले आहे.
. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत तसेच आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुलासाठी जप्त केलेली रेती देण्याबाबतची तरतूद आहे. तसेच प्रधानमंत्री, रमाई, शबरी, यशवंतराव चव्हाण आवास योजने अंतर्गत मंजूर झालेल्या पण रेती अभावी घरकुलाचे काम सुरु न झालेल्या लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्याबाबतची यादी गटविकास अधिकारी वरोरा यांच्या कडून तहसील कार्यालयास प्राप्त झाली. त्यानुसार जप्त केलेली अंदाजे 58 ब्रास रेती 17 लाभार्थ्यांना वितरित करण्यात आली.
. यात प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थी राजु अण्णाजी तुमराम, अनिला हरीचंद्र नन्नावरे, नरेश प्रभाकर कोडापे, गोविंदा उध्दवराव सपाटे, रेखा रमेश भोयर, सविता विलास चिडे, संगीता ऋषी कुळमेथे, ईश्वर गोमाजी परचाके, मंजुळा विश्वनाथ आसुटकर, रामकृष्ण पुंजाराम चौधरी, मधुकर शंकर इंगळे, दादाजी हरबाजी आसुटकर, अजाब शंकर इंगळे, वासुदेव उध्दव सपाटे, राजु नानाजी मेश्राम, अशोक वामन येरणे, मन्साराम गोविंदा मसराम या लाभार्थ्यांना मोफत प्रत्येकी 3 ब्रास रेती चे वितरण करण्यात आले. यासाठी गौण खनिज वितरण, वाहतुक पासेस व गस्त पथक असे 3 पथक तयार करण्यात आले आहे. या पथकात ग्राम महसूल अधिकारी, बोर्डा, सायली चिकाटे, ग्राम पंचायत अधिकारी, बोर्डा, पोलीस पाटील, बोर्डा, नितुल हक्के, महसूल सेवक, बोर्डा, गिरीश बोरडे, नायब तहसीलदार (निवासी) तहसील कार्यालय, वरोरा, रविंद्र गेडाम, मंडळ अधिकारी, वरोरा, चंदन करमनकर, ग्राम महसूल अधिकारी, खांजी, श्रध्दा जिल्हेकर, ग्राम महसूल अधिकारी, वरोरा यांचा समावेश होता. अशी माहिती तहसिलदार योगेश कौटकर यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
. सन 2021 ते 2024 मध्ये रेती चोरी संबंधाने 31 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदर गुन्हयात आरोपी यांचेकडून वाहतुक करीत असतांना मिळुन आलेल्या वाहनामध्ये असलेली एकूण रेती अंदाजे 58 ब्रास जप्ती करुन पोलीस स्टेशन, वरोरा येथील आवारामध्ये ठेवण्यात आलेली होती.


