Home चंद्रपुर जिल्हा विशेष साहेब मानधनच नाही तर खायचं काय ?

साहेब मानधनच नाही तर खायचं काय ?

1062

रोजगार सेवकाची होळी अंधारात

नेरी : मागील सहा महिन्यापासून ग्रामरोजगार सेवकांचे मानधन मिळाले नाही परिणामी उपासमारीची वेळ आली. कुटुंबाचा गाडा कसा हकायचा असा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाने या बाबीकडे लक्ष घालून तात्काळ ग्रामरोजगार सेवकांचे मानधन उपलब्ध करून द्यावे जेणेकरून ग्रामरोजगार सेवकांची होळी साजरी होतील.

.        ग्रामाच्या विकासासाठी महत्वपूर्ण घटक म्हणून ग्रामरोजगार सेवकाकडे पाहिले जाते महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत ग्राम विकासाचे कामे या कामावर मजुरांना कामे देऊन लाभ मिळवून देणे, शासनानाच्या अनेक योजनेचे लाभ लाभार्थ्यांना मिळवून देणे ,नियमित ग्रा प अंतर्गत रोजगार उपलब्ध करून देणे शासनाच्या योजनेची माहिती देणे तसेच ईतर अनेक लोकउपयोगी कामे करून जनतेची सेवा करणे असे जनतेची कामे करणारा ग्रामरोजगार सेवक तुटपुंज्या मानधनात काम करीत आहे मात्र प्रशासनाला अनेकदा निवेदने मोर्चे कडूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे मागील सतरा वर्षांपासून कसलाही विचार न करता काम करीत आहे मात्र या आधुनिक युगात महागाईत परवडेल असे मानधन द्यायला पाहिजे मात्र शासन याकडे कानाडोळा करतांना दिसत आहे.

.     ग्रामीन विकासाचा कणा म्हणून रोजगार सेवक ओळखल्या जाते ग्रामीण जनता आणि शासन यांच्यातील दुवा म्हणून काम पाहणारा महत्वाचा घटक मात्र दुर्लक्षित आहे तेव्हा शासनाने ग्रामरोजगार सेवकांच्या गंभीर बाबीकडे जातीने लक्ष देऊन मानधन तात्काळ द्यावा अशी मागणी माजी अध्यक्ष देविदास दैवले व ग्रामरोजगार संघटनेने केली आहे.

error: Content is protected !!