Home चंद्रपुर जिल्हा विशेष भांडे किट घेण्यासाठी बांधकाम कामगारांच्या रांगाच रांगा

भांडे किट घेण्यासाठी बांधकाम कामगारांच्या रांगाच रांगा

1086

भांडे वितरणाचा बोजवारा उडाला

नंबर लावण्यासाठी महिलांचा रात्री मुक्काम

चंद्रपूर : इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत बांधकाम कामगारांना संसारोपयोगी भांडी संच वाटप करण्यात येत आहे. या वितरण कार्यालयात कामगारांच्या रांगाच रांगा लागल्यामुळे भांडे वितरणाचा बोजवारा उडाला आहे.

.       मोरवा येथे बांधकाम कामगार कार्यालयाचे वितरण केंद्र आहे. तेथे संसारोपयोगी भांडे संचासाठी हजारो बांधकाम कामगार दररोज रांगेत उभे राहत आहेत. या कामगारांना साधी पाण्याची सुद्धा व्यवस्था केल्या गेली नाही. भर उन्हात लहान लहान मुलांना महिला कामगार घेऊन रांगेत लागतात काही कामगार तर आपला नंबर लवकर लागावा म्हणून रात्रीच मुक्कामाने जात आहे. . त्यामुळे कामगार कार्यालयाने संसारोपयोगी भांडे संच वितरणाची व्यवस्था सुरळीत करून वितरण केंद्र वाढविण्याची गरज असल्याचे गर्दीवरून दिसून येत आहे. या वितरण केंद्रावर अनेक बांधकाम कामगार दिवसभर रांगेत उभे राहूनही नंबर न आल्यामुळे रात्रीचा मुक्काम येथेच रस्त्यावर करीत आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्यानेजीवाची लाही लाही होत असताना बांधकाम कामगारांची हेळसांड होत आहे. त्यामुळे बांधकाम कामगार कार्यालयाने संसारोपयोगी भांडे संच वितरणाची व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी बांधकाम कामगारांतून होत आहे.

error: Content is protected !!