Home सामाजिक शिंपी समाज संघटित होणे काळाची गरज – तुलसीदास महाराज

शिंपी समाज संघटित होणे काळाची गरज – तुलसीदास महाराज

1064

भद्रावती : श्रीसंत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जीवन चरित्रावर आपल्या ओजस्वी वाणीने प्रकाश टाकून आपल्या समाजासाठी सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याचे आव्हान पंजाब राज्यातील तुलसीदास महाराज यांनी येथील समाज बांधवांना केले. श्रीराम नगर येथील शिवमंदिरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

.        कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीसंत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गेल्या ४० वर्षापासून आपण देशभर श्रीसंत नामदेव महाराज यांच्या जीवन चरित्राची माहिती समाज बांधवांना किर्तन व सत्संगाद्वारे देत आहो असे त्यांनी सांगितले. याद्वारे समाज संघटन करण्याचा आपला मानस असल्याचे ते म्हणाले. ७६ वर्षीय तुलसीदास महाराज यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.

.     कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन दिलीप ठेंगे तर आभार प्रदर्शन किरण देवगिरकर यांनी केले. यावेळी गुलाब मनगटे, पांडुरंग ढपकस, अनिल टिकले, बबन ढाले, महेंद्र मनगटे, प्रफुल्ल ढाले, अरुण किटे, दीपक खोडे, पुरुषोत्तम ठाकरे, चंद्रकांत खाडे, विजय कीटे, पांडुरंग मांडवकर, मंगेश ढपकस, कांचन ठेंगे, सीमा ठेंगे, कल्पना टिकले, सरिता खाडे, वर्षा ठेंगे, मीरा मनगटे, जान्हवी ठेंगे यासह समाज बांधव आणि भगिनी उपस्थित होत्या.

error: Content is protected !!