Home चंद्रपुर जिल्हा विशेष अंत्ययात्रेत मधमाश्यांचा नागरिकांवर हल्ला

अंत्ययात्रेत मधमाश्यांचा नागरिकांवर हल्ला

1058

तीन जखमी

मोटेगाव येथील नदी घाटावरील घटना

नेरी : चिमुर तालुक्यातील मोटेगाव येथे नदी घाटावर अंतिमसंस्कार करण्यासाठी निघालेल्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांवर मधमाश्यांनी अचानक अनपेक्षित हल्ला चढवला यात तीन जण जखमी झाल्याची घटना 7 मार्चला सकाळी 10 वाजताच्या दरम्यान घडली. त्यामुळे अंत्ययात्रेत गोंधळ निर्माण झाला.

.      मोटेगाव येथे झोडे नामक इसमाचा निधन झाले होते त्यांचा अंतिम संस्कार करण्यासाठी उमा नदी घाटावर सकाळी 10 वाजता दरम्यान सर्व नातेवाईक मित्र परिवार यांच्या उपस्थितीत अंत्ययात्रा निघाली. सदर यात्रा नदीघाटा जवळ येताच अचानक मध माशाच्या थव्यांनी अचानक अनपेक्षित हल्ला चढविला यात समोरील तीन व्यक्तीना मधमाश्यांनी जखमी केले. यामुळे अंत्ययात्रेत गडबड झाली मात्र काहीवेळाने मधमाश्या शांत होऊन निघून गेल्याने पुढील अनर्थ टळला यात देवराव नाकाडे बोळधा कृष्णा सुकारे मोटेगाव आणि प्रभाकर नाकाडे शिवनपायली हे जखमी झाले. या जखमींना तात्काळ मोटेगाव येथे आणून त्यांना चिमूर येथील उपजिल्हारुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले सदर जखमींना उपचार करून सुट्टी देण्यात आली असून त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती देण्यात आली आहे.

error: Content is protected !!