सिंदेवाही : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च २०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालय पळसगाव जाट येथे महिला सभा घेण्यात आली. यात महिला दिनाचे महत्व विशद करून महिला विषयक कायदे, महिला विषयक योजना, महिलाचे अधिकार,महिलांची विविध क्षेत्रात झालेली प्रगती याबाबत ग्रामपंचायत अधिकारी अशोक शिंदे यांनी माहिती दिली.
. जागतिक महिला दिनानिमित्य घेण्यात आलेल्या मार्गदर्शन कार्यक्रमात ग्रामसंघाच्या पदाधिकारी कुसुम लांजेवार, ज्योती अलमस्त, सीमा गणवीर,आशा वर्कर शिल्पा मेश्राम, कौशल्या नागोसे, अंगणवाडी सेविका रुपाली हटकर, परिचारिका मारबते यांनी जागतिक महिला दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.
. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच जगदीश कामडी तर प्रमुख उपस्थिती उपसरपंच संतोष गायकवाड होते. कार्यक्रमाचे संचालन सुप्रिया सातपुते यांनी तर आभार प्रदर्शन ज्योती सहारे यांनी केले.


