Home सामाजिक संसारासाठी खाचखळग्याचा प्रवास करणाऱ्या महिलांचा सन्मान !

संसारासाठी खाचखळग्याचा प्रवास करणाऱ्या महिलांचा सन्मान !

1065

सार्वजनिक महिला समितीची सामाजिक बांधिलकी

विसापूर येथे विविध उपक्रमाचे आयोजन

बल्लारपूर : आजघडीला आपली समाजरचना पुरूषप्रधान आहे. समाजात महिलांना गौण स्थान आहे. यात काही महिला अपवाद आहे. अशाच महिलांपैकी त्यांनी संसारासाठी स्वत्व सोडले. त्यांनी साधे जीवन जगण्याला महत्व दिले. शेती व्यवसायात स्वतःला गुंफूण घेतले.नटणे,मुरडण्याला फाटा दिला. पतिच्या वार्धक्यात व निधनाने त्या हतबल झाल्या नाही. त्यांचे कर्तृत्व समाजा समोर यावे.या अनुषंगाने संसारासाठी खाचखळग्याचा प्रवास करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान विसापूर येथे शनिवार ( दि. ८ ) मार्च ला करण्यात आला. या सन्मानाच्या मानकरी प्रेमिला पांडुरंग पारखी,कांता सुधाकर टोंगे व वच्छला लटारी वाढई होत्या.

.       बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील सार्वजनिक महिला समितीच्या माध्यमातून पंढरीनाथ देवस्थान, मंगल कार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले.यावेळी कर्तृत्ववान महिला म्हणून प्रेमिला पारखी, कांता टोंगे व वच्छला वाढई यांचा शाल,श्रीफळ व स्मृतीचिन्ह प्रदान करून भावपूर्ण सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच रिता जिलटे होत्या. उदघाटक म्हणून महसूल अधिकारी आरती दुलत, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जि.प.सदस्य सुमन गौरकार,रंजना गिरडकर,माया जीवने यांची उपस्थिती होती.

.    एकीकडे महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी केल्या जात आहे. मात्र पितृसत्ता, श्रेष्ठत्व, धर्मसत्ता, जातीव्यवस्था, अर्थसत्ता व राजसत्ता हातात हात धरून महिलांचा अपमान केला जात आहे. एकविसाव्या शतकातील हे भयाण वास्तव आहे. आता आत्मसन्मान मिळविण्यासाठी महिलांनी संघटीत व्हा, असे प्रतिपादन आनंदा कांबळे यांनी याप्रसंगी केले. प्रास्ताविक भाषणातून शारदा डाहुले यांनी सार्वजनिक महिला समितीच्या सामाजिक बांधिलकी व जागतिक महिला दिनाच्या विविध उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रामपंचायत सदस्य रिना कांबळे, हर्षला टोंगे, सुरेखा ईटनकर, वैशाली पुणेकर, सरोज केकती, सुवर्णा कुसराम, आशा काळे, मंजुषा पावडे आदींनी सहकार्य केले.

error: Content is protected !!