दोन भावंडाचा जागीच मृत्यू
पांढरपौनी गावाजवळील घटना
गडचांदूर : गडचांदुर – राजुरा मार्गावर असलेल्या पांढरपौनी गावाजवळ राजुरा मार्गे गडचांदुरकडे मोटारसायकलने दोन भावंडे येत असताना पांढरपौनी बसस्थानक जवळ रोडचे काम सुरू असलेल्या उभ्या ट्रॅक्टरला मोटरसायकलची जोरदार धडक बसली. या अपघातात दोन्ही भावंडाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. भाऊराव पांडुरंग सातपुते (५२) व देवराव रामाजी सातपुते (४५) दोघेही रा गडचांदुर असे मृतक भावंडाचे नाव आहे.
. प्राप्त माहितीनुसार मृतक भाऊराव सातपुते हा माणिकगड सिमेंट कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करत होता. तर देवराव सातपुते जिल्हा परिषद चंद्रपूर येथे लिपिक या पदावर काम करीत होते. दोघेही काही कामानिमित्त राजुरा येथे आले असता सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान बाखर्डी येथे काही कामानिमित्त राजुरा गडचांदूर मार्गे निघाले असता पांढरपौनी या गावाजवळ राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून त्या ठिकाणी खड्डे खोदण्याचे काम ट्रॅक्टरच्या माध्यमातून चालू आहे. या ठिकाणी रस्त्यावर काम सुरू असल्याबाबत माहिती दर्शविणारी फलक व रिप्लेक्टर लावले नाही किंवा रस्ता बंद केलेला नसल्यामुळे सातपुते यांनी मोटरसायकल काम सुरू असलेल्या बाजूनेच मोटरसायकल टाकली असल्याने व याचवेळी रस्त्याचे काम सुरू असलेले ट्रॅक्टर आणि मोटरसायकल याच्यात जोरदार टक्कर झाल्याने सातपुते बंधू दोघेही जागीच ठार झाले.
. घटनेची माहिती राजुरा पोलिसांना मिळाली असता राजुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, सहायक पोलीस निरीक्षक पवार व वाहतूक शाखेचे शिपाई तुमसर यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणी करता उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय राजुरा या ठिकाणी आणण्यात आले व पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.


