“प्रशासन गाव की ओर अभियान” राबविणार – तहसीलदार संदीप पानमंद
सिंदेवाही : माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त २५ डिसेंबर हा दिवस दरवर्षी सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने केंद्र शासनाच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या निर्देशानुसार सिंदेवाही तालुक्यातही १९ ते २४ डिसेंबर या कालावधीत सुशासन सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
. शासनाच्या या लोकांभिमुख संकल्पनेला सर्वसामान्य नागरिकांनी अभियानात सहभागी होऊन आपल्या प्रलंबित अडीअडचणी सोडवाव्यात असे आवाहन सिंदेवाहीचे तहसीलदार संदीप पानमंद यांनी केले आहे. सुशासन सप्ताहचा एक भाग म्हणून प्रशासन गाव की ओर अभियान राबविण्यात येत आहे. या सप्ताहात प्रशासनाच्या नवनवीन संकल्पना व उपक्रमाद्वारे नागरिकांच्या सार्वजनिक तक्रारीचे निवारण व ऑनलाईन सेवा वितरण अर्जाचा निपटारा करण्यात येणार असल्याचे सिंदेवाही तहसीलदार संदीप पानमंद यांनी सांगितले.


