Home सामाजिक आधारभूत केंद्रावर नोंदणीकृत धान शेतकऱ्यांना बोनस जाहीर

आधारभूत केंद्रावर नोंदणीकृत धान शेतकऱ्यांना बोनस जाहीर

1248

सोयाबीन, कापूस, संत्रा पिकासाठीही मिळणारं आर्थिक मदत

पंकज रणदिवे

   नेरी : दरवर्षी आधारभूत किंमत खरेदी योजना अंतर्गत शेतकरी धान विक्री साठी नोंदणी करीत असतात त्या नोंदणीकृत शेतकऱ्यानं कधी धान विक्री वर तर कधी सरसकट बोनस शासनाकडून देण्यात येत आहे.

.     महायुतीचे शासन आले तर धानाला बोनस देणार अशी घोषणा केली होती त्याप्रमाणे या वर्षी सुद्धा धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20 हजार रुपये बोनस देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना आधार मिळणार असून याचा फायदा लाखो शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच वर्धा, अमरावती, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यातील 55 हजार शेतकऱ्यांच्या संत्रा पिकांची गळती झाली होती. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तीन हेक्टर क्षेत्र मर्यादित प्रमाणे जवळपास 165 कोटी रुपयांची मदत देण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

.    सोयाबीन व कापूस उत्पादकाला योग्य मदत दिली जात असून राज्यात 557 हमी भाव खरेदी केंद्रावर आतापर्यंत जवळपास 23 लाख 68 हजार 475 क्विंटल इतकी सोयाबीन खरेदी करण्यात आले आहे. मागील पंधरा वर्षाच्या तुलनेत ही मोठी खरेदी आहे. ही खरेदी केंदे 12 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाद्वारे मध्यप्रदेशच्या धरतीवर खेरेदी व्यवस्था सुरू करण्यासंदर्भात संबंधित अधिऱ्यांना सूचना दिल्या आहेत व त्याचा अभ्यास करून योग्य शेतकरी होतंय निर्णय घेण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमत्र्यांनी विधानसभेत केली.

‘भाजप’ चे पहिलेच आश्वासन ठरले खोटे                                                                                                                                        भाजपाने घोषणा पत्रात धान उत्पादक शेतकऱ्यांना 25 हजार रुपये प्रती हेक्टरी बोनस देण्यात येईल अशी घोषणा केली होती. मात्र सत्तेत येताच स्वतःचेच दिलेले आश्वासन खोटे ठरविले असून शेतकऱ्यांना 25 हजार ऐवजी 20 हजारच हेक्टरी मदत मिळणार असल्याने शेतकऱ्यांना हेक्टरी 5 हजार म्हणजे एकरी जवळपास 2 हजार रुपयांचा घाटा सहन करावं लागत असल्याने शेतकऱ्यांत नाराजीचे सुर उमटत आहे.

error: Content is protected !!