Home चंद्रपुर जिल्हा विशेष सरडपार, अडेगाव, पांढरवाणी शेत शिवारात पट्टेदार वाघाचा वावर

सरडपार, अडेगाव, पांढरवाणी शेत शिवारात पट्टेदार वाघाचा वावर

1257

दररोज शेतकऱ्यांना वाघाचे दर्शन

वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा

शेतकऱ्यांची मागणी

नेरी : नेरी परिसरात वाघाने धुमाकूळ घातला असून वाघाचे रोज या परिसरात दर्शन होत असल्याने शेतकरी भयभीत झाला आहे. रब्बी हंगामाला सुरवात झाली असून शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तर कापूस काढणे जोमाने सुरू आहे. मात्र वाघाच्या दहशतीने शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहे. तेव्हा वनविभागाने या वाघांचा बंदोबस्त करावा अशी मागणी काशीनाथ चांदेकर अध्यक्ष शेतकरी संघटना नेरी विभाग यांच्या सहित परिसरातील शेतकरी करीत आहेत.

.     सध्या नेरी परिसरातील कटारा रिट, भुराजी देवस्थान सरडपार, नदी घाट वाघेड, गोंदेडा, खतोडा, वडसी, अडेगाव, देश म्हसली, उसेगाव, मोखाला, पांढरवाणी या शेतशिवरात वाघाची चांगलीच वर्दळ असून वावर आहे. या परिसरातील जनावरांना सुद्धा फस्त केले आहे. तसेच मागील महिन्यात मंदाडे नामक वडसी येथील महिलेला जखमी केले. तर दि 9 डिसेंबर पांढरवाणी येथील शोभा पंधरे यांच्यावर हल्ला केला होता. तर 11 डिसें ला शेतात नागरटी करीत असलेल्या सोमदेव नाकाडे या ट्रकटर चालकाचा पाठलाग केला. यामुळे शेतकरी मजूर वर्गात कमालीची धास्ती निर्माण झाली आहे. शेतातील पिकांना पाणी द्यावे कसे तसेच कापूस कसे काढावे. या विवंचनेत शेतकरी वर्ग मजूर वर्ग सापडला आहे. वाघाचे वाढते दर्शन शेतकऱ्यांची धास्ती वाढवीत आहे. वाघ हा एक नसून बरेच आहेत अशी चर्चा नागरिकांत रंगताना दिसत आहेत. आणि ते सर्व वाघ व्याघ्रप्रकल्प ताडोबा येथील बफर क्षेत्रातून आले आहेत असे नागरिक बोलीत आहेत. तेव्हा वनविभागाने या वाघांचे बंदोबस्त करावे अशी मागणी काशिनाथ चांदेकर सहित परिसरातील अनेक शेतकरी वर्गानी केली आहे.

error: Content is protected !!