Home चंद्रपुर जिल्हा विशेष पिरली येथील युवा शेतकऱ्याचा सर्प दंशाने मृत्यू

पिरली येथील युवा शेतकऱ्याचा सर्प दंशाने मृत्यू

1289

भद्रावती : शेतातील तुर पिकांवर फवारणी मारत असताना अचानक विषारी सापाने चावा घेतला. सापाने चावा घेतल्याचे माहित होतात घरच्यांनी त्याला वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. राकेश नत्थूजी बोथले (36) असे मृतक युवा शेतकऱ्याचे नाव आहे.

.      तालुक्यातील वाघेडा (से ), पिरली गाव परिसर जंगल व्याप्त आहे. या जंगलात हिंसक प्राणी तसेच विषारी सरपटणारे साप आहे. यामुळे परिसरातील शेतकरी आपला जीव मुठीत घेऊन शेती करतात व पीक वाचविण्या साठी प्रयत्न करतात.
राकेश ने आपल्या कपाशी पिकात आंतरपीक म्हणून तूर पिकाची लागवड केली होती त्या तुरीवर अड्यांचा प्रादुर्भाव झाल्याने किटकनाशक फवारणी करण्यासाठी युवा शेतकरी राकेश नत्थूजी बोथले 11 डिसेंबरला सकाळी शेतात गेला. तूर पिकावर फवारणी मारत असताना अचानक दुपारी 1 वाजताच्या सुमारास विषारी सापाने पायाला चावा घेतला. हे घरच्यांना माहित होताच त्याला वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालय मध्ये दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे नेण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान राकेशचा दि 13 ला पहाटे 2 च्या सुमारास मृत्यू झाला. या शेतकऱ्यांच्या पश्चात पत्नी पपीता राकेश बोथले, मुलगा आयुष (13) आणि मुलगी आरोही ( 8 ) आई वडील म्हातारी आजी आणि दोन भावंडे असा परिवार आहे. सर्पदंशाने युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

युवा शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासनाने 25 लाख रुपये अनुदान द्यावे                                                                                                                                                                                                 साप आणि वाघ हे वन्यप्राणी असून शेतकरी यांना नेहमी या प्राण्या सोबत शेती करतांना संपर्कात राहावे लागतात, वन्य प्राणी व सरपटणारे प्राणी या दोन्ही प्राण्यामुळे जवळ पास सारखेच शेतकरी शेतमजूर मरण पावल्याच्या घटना घडत आहे. त्यामुळे शेतकरी यांना वाघाने मारल्यास 25 लाख शासन अनुदान संबंधिताच्या नातेवाईक यांना देतात तसेच सापामुळे पण शेतकरी यांचा मृत्यू झाल्यास 25 लाख रुपये शासनाने अनुदान नातेवाईक यांना देण्यात यावे.                                                                                                                                                               किशोर डुकरे,                                                                    शेतकरी नेते वरोरा

error: Content is protected !!