नागभीड : आकांक्षी शिक्षक आणि शिक्षक कार्यशाळा गुरुकुल या इव्हेंटसाठी संपुर्ण भारतामधुन 150 विज्ञान शिक्षकाची निवड करण्यात आलेली होती कर्मवीर विद्यालय, नागभिड च्या रजनी सुधाकर चिलबुले याची वैज्ञानिक गुणवत्तेच्या आधारावर दुसऱ्यांदा निवड करण्यात आली होती.
. गुवाहाटी (आसाम) येथे आयोजित 10 व्या भारत आंतरराष्र्टीय विज्ञान महोत्सव दिनांक 30 नोव्हेंबर ते दिनांक 04 डिसेंबर रोजी संपन्न झाला . या चार दिवसीय मेगा विज्ञान महोत्सवात 24 प्रकारचे विविध कार्यक्रम झाले. यामधे 7 हजार प्रतिनिधी आणि 45 हजार लोकं मोठ्या संख्येने उपस्थीत झाले. या आयआयएसएफ चे महत्वाचे आर्कषण म्हणजे चंद्राची वास्तविक पृष्ठभाग प्रतिकृती होय. चंद्राची 10 मी उंच प्रतिकृती अंतराळ विज्ञानात भारताची प्रगती दर्शविते. यावर्षी काही नविन कार्यक्रम जोडले गेले होते. सागरिका द टेल ऑफ अर्थ सायन्स या इव्हेंटचा उद्देश लोकांना पृथ्वी विज्ञानाच्या विविध क्षेत्रामधे जसे की, हवामानशास्त्र, समुद्र विज्ञान, इकाॅलाॅजी इ.विषयांवर लोकांना सहभागी करुन घेणे आणि शिक्षित करणे हा आहे. या इव्हेंटद्वारे पर्यावरणीय समस्यांवर जनजागृती करु इच्छीते. देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञावर भर दिला गेला.
. जागतिक आव्हांनांना सामोरे जाण्यासाठी शास्त्रज्ञ, संशोधक आणि संस्थांमधे आंतरराष्र्टीय सहयोग, भागीदारी आणि संवादांची देवाणघेवाण वाढविणे हे उद्दिष्टये आहे. फ्युजन फोरम अॅटाॅमिक असेंम्बली इव्हेंटमधे विद्दुत निर्मिती, अनुऔषध, कृषी, अँडीट्यु मँनीफँक्चरींग इ. विविध क्षेत्रासाठी भारतातील अनुऊर्जा लागु करण्यासाठी वर्तमान दृष्टीकोन, भविष्यातील फायदे आणि महत्वाची आव्हाने यावर विस्तृत चर्चा करण्यात आली. विज्ञान सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहचविण्यात विग्यानिका इव्हेंटने महत्वपुर्ण भुमिका बजावली. आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अँड पॉलिसी रिसर्च द्वारे आयोजित, या कार्यक्रमाचा उद्देश विज्ञान संभाषणकार, पत्रकार, मिडिया, व्यावसायिक यांच्यातील दरी कमी करणे हा होय. त्याच बरोबर बालवैज्ञानिक, बालसंशोधक यांना प्रोत्साहित करणे आणि विज्ञान क्षेत्रामधे भारताची प्रगती करणे हाच IISF चा उद्देश आहे.
. आकांक्षी शिक्षक आणि शिक्षक कार्यशाळा गुरुकुला या इव्हेंटसाठी संपुर्ण भारतामधुन 150 विज्ञान शिक्षकाची निवड करण्यात आलेली होती कर्मवीर विद्यालय, नागभिड च्या रजनी सुधाकर चिलबुले (कामडी) याची वैज्ञानिक गुणवत्तेच्या आधारावर दुसऱ्यांदा निवड करण्यात आली होती. रोजच्या अध्यापन कार्यात विद्यार्थ्यांना याचा निश्चीतच फायदा होईल आणि त्यांच्यामधे वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होईल असे प्रतिपादन यांनी व्यक्त केले. डायट प्राचार्य सन्माननीय हिवारे, संस्था सचिव जनवार, संचालिका जनवार, मुख्याध्यापक चिलबुले, परिवेक्षक इडपाचे सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन, कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


