Home चंद्रपुर जिल्हा विशेष बाम्हणी शाळेला शिक्षक दया नाहीतर शाळा बंद पाडू

बाम्हणी शाळेला शिक्षक दया नाहीतर शाळा बंद पाडू

1322

शाळा व्यवस्थापन समितीचा इशारा

गटविकास अधिकाऱ्यांला निवेदन

नागभीड : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाम्हणी येथे वारंवार शिक्षक मिळण्यासाठी अर्ज करून सुद्धा प्रशासनाकडून शिक्षक न मिळाल्याने शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी गटविकास अधिकारी, नागभीड यांना पंधरा दिवसांमध्ये शाळेला शिक्षक द्यावे, अशी मागणी करत शाळेला शिक्षक न मिळाल्यास शाळा बंद पाडू असा इशारा निवेदनातून दिला आहे.

.    जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाम्हणी येथे पहिली ते चौथीपर्यंत एकूण 73 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र गेल्या तीन महिन्यापासून इथे पुरेसे शिक्षक नाहीत. शाळेमध्ये फक्त दोनच शिक्षिका कार्यरत आहेत. येथे तीन शिक्षकांची आवश्यकता आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये खूप मोठी तफावत असल्याचे दिसून येत आहे. या शाळेला एका शिक्षकाची गरज असुन विद्यार्थ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे पालक चिंतेत आणि संतप्त आहेत. वारंवार पालकांच्या तक्रारी शाळा व्यवस्थापन समितीकडे येत आहेत. नवीन शिक्षक मिळावा याकरिता वारंवार गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे अर्ज दिला असता कोणतीही यावर कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये ठरविण्यात आले की जर 15 दिवसात शिक्षक उपलब्ध केले नाही तर शाळा बंद पाडू, असा ठराव शाळा व्यवस्थापन समितीने पारित केलेला आहे. अशा मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी स्नेहल लाड यांना देण्यात आले आहे.

– जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या शाळेला पुरेशी जागा, क्रिंडागंण, वर्गखोल्या बरोबर नाहीत. काही मुलांना गणवेश मिळाले नाही. शिक्षकामुळे विद्यार्थीचे नुकसान होत आहे.                                                                                                             विराग वाकडे,                                                    अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती बाम्हणी

error: Content is protected !!