भारतीय बौध्द महासभेचे तहसीलदारांना निवेदन
नागभीड : भारतीय बौध्द महासभा नागभीडच्या वतीने परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या जवळील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड व विटंबना करणाऱ्या व्यक्तीवर कार्यवाही करण्याबाबत तहसीलदार यांच्या वतीने महाराष्ट्राचे राज्यपाल व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
. महाराष्ट्रातील जिल्हा परभणी येथें भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णकृती पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे. दिनांक 10 डिसेंबर 2024 ला कोणी अज्ञात व्यक्तीने सदर संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड करून विटबना केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधान संपूर्ण भारतीयांचा मानबिंदू असून विटबना करणे हा संपूर्ण भारतीयांचा अपमान झालेला आहे. अशा घटना पुन्हा घडू नये म्हणून आपण दोषीवर कारवाही करून त्या मागचा सूत्रधार कोण आहे याचा शोध घेऊन कारवाही करावी.
. यावेळी निवेदन देताना श्याम रामटेके, अमृत शेंडे, रामकृष्ण रामटेके, प्रशांत गेडाम, पत्रकार आनंद मेश्राम, मनोहर रामटेके, प्रकाश वाकडे, अशोक रामटेके सह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.


