Home चंद्रपुर जिल्हा विशेष वाघाने केला शेतात नांगरटी करणाऱ्या ट्रॅक्टरचा पाठलाग

वाघाने केला शेतात नांगरटी करणाऱ्या ट्रॅक्टरचा पाठलाग

1325

नेरी परिसरात वाघाची दहशत

वाघाचा बंदोबस्त करा – शेकऱ्यांची मागणी

पंकज रणदिवे

   नेरी : शेतात ट्रॅक्टर ने नागरटी करीत असताना अचानक शेतात वाघ आला. वाघाला बघताच ट्रॅक्टर चालक सोमदेव नाकाडे यांना धडकी भरली आता काय करावे या विवंचनेत त्यांनी ट्रॅक्टर शेतातून बाहेर काढले असता वाघाने ट्रॅक्टर चा पाठलाग केला. यावेळी ट्रॅक्टर रस्त्यावर आल्यावर वाघाने पिच्छा सोडला आणि नदीत उडी मारून पसार झाला. अशी थरकाप उडवणारी घटना चिमूर तालुक्यातील नेरी ला लागून असलेल्या सरडपार शेतशिवारात 11 डिसेंबरला सकाळच्या सुमारास घडली. शेत शिवारात वाघ आल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

.     नेरी परिसरातील अडेगाव देश, म्हसली, वाघेडा, वडसी, गोंदेडा, सरडपार, पांढरवाणी या गावात वाघाने मागील दोन महिन्यांपासून धुमाकूळ घातला आहे. अनेक जनावरे सुद्धा मारली गेली तर दि 9 डिसें ला पांढरंवाणी येथील महिला कापूस वेचायला शेतात गेली असता कापूस वेचताना वाघाने एका महिलेवर हल्ला केला. सुदैवाने इतर महिलांच्या आरडा ओरड्यामुळे वाघ तिला सोडून पसार झाला. त्यामुळे सदर शोभा गोसाई पंधरे या महिलेचे जीव वाचले या हल्ल्यात तिला हाताला किरकोळ जखम झाली आहे. यामुळे मजूर वर्गात सुद्धा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतीचे कामे कसे करावे हा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा टाकला आहे ?

.      सदर परिसरात मागील महिन्यापासून या परिसरात वाघाचे रोज दर्शन होत असल्याने नागरिकांची घाबरगुंडी उडाली आहे. अनेकदा या बाबतीत वनविभागाला माहिती देण्यात येताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आहेत. वाघाला हुसकवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्या परिसरात गस्त लावून फटाके फोडून वाघाचा बंदोबस्त करण्याचा त्यांचा पुरेपूर प्रयत्न सुरू आहे. मात्र वाघ हा या ठिकाणी आज तर उद्या दुसऱ्या ठिकाणी दिसत असल्याने त्यांची सुद्धा धावपळ उडत आहे. यावरून वाघ हे जास्त संख्येनी या परिसरात असावे अशी शंका उपस्थित केली जात आहे. सदर वाघ हे ताडोबा व्याघ्रप्रकल्पतील बफर क्षेत्रातुन आले असल्याची चर्चा आहे. नेरी येथील घटनेत ट्रॅक्टर परत आणल्याने चालकाचे जीव वाचले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वाघांना पकडून त्यांचे स्थलांतर करावे अशी मागणी होत आहे.

error: Content is protected !!