अपघातात 19 प्रवासी जखमी
जखमीवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु
नागभीड : बाम्हणी – मांगली फाट्यावर बस व कंटेनर च्या धडकेत 19 प्रवासी जखमी झाल्याची घटना नागभीड पासून 5 किमी अंतरावर घडली. या अपघातात राज्य परिवहन मंडळाच्या बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. असून जखमी प्रवाश्यांवर ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे उपचार सुरू आहे.
. प्राप्त महितीनुसार बस क्रमांक एमएच 40 एन 8657 ही पवनी वरून 22 ते 25 प्रवाशी घेऊन नागभीड ला येत होती.. कंटेनर क्रमांक MH 40 6459 हा नागभीड वरून विरुद्ध दिशेने कोटगाव कडे जात होता. दरम्यान बाम्हणी जवळील तलाठी कार्यालयाजवळ असलेल्या वळणावर बस व कंटेनर यात जोरदार धडक झाली. याचा जोरात आवाज आल्याने तलाठी कार्यालयात कार्यरत असलेल्या तलाठी वृषाली दाचेवार या लागलीच बाहेर आल्या व त्याना अपघात झाल्याचे दिसताच त्यांनी घटना स्थळाकडे धाव घेतली व नागभीड पोलीस स्टेशन ला अपघाताची माहिती दिली व रुग्ण वाहिकेची मागणी केली.. एवढ्यात गावातील नागरिक, पोलीस पाटील घटना स्थळी दाखल झाले. नागभीड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अपघात स्थळी आले व त्यांनी जखमींना आपल्या वाहणात मांडून ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले.. व उर्वरित जखमीना रुग्ण वाहिकेच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
. सदर घटना ही 1.30 ते 1.45 च्या दरम्यान घडली. एका जखमी प्रवश्याला चंद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित प्रवाशी हात,पाय, डोळ्याला जखमा झालेल्या असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. दरम्यान नागभीड पोलीस स्टेशन चे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात घटना स्थळी पोलीस दाखल झाले व घटनेचा पंचनामा केला. व झालेल्या अपघाताची चौकशी सुरु केलेली आहे. दरम्यान राज्य परिवहन महामंडळाचे सुद्धा अधिकारी पोहचले असून झालेल्या घटनेचा पंचनामा करून झाले असून प्रवाश्यांचे बयान घेणे सुरु आहे. या अपघातात कंटेनर हा पलटी झालेला असून बस चे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


