वरोरा : छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय सेवा महाविद्यालय सूर्ला वरोरा येथे संविधान दिन साजरा करण्यात आला.
. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य दिनकर गुरनुले यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख मार्गदर्शक प्रा. विनोद कोरडे यांनी विद्यार्थ्यांना संविधाना विषयी मार्गदर्शन केले. तसेच संविधान प्रस्ताविकेचे वाचन विद्यार्थ्यांकडून करण्यात आले.
. या कार्यक्रमा प्रसंगी महाविद्यालयाचे प्रा. दिपक खामनकर, प्रा. मनोज खांडारकर, प्रा. सुहास झाडे, प्रा. भारती पाटील, प्रा. निकिता कापसे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाची विद्यार्थिनी ऋतुजा मोडक तर आभार प्रदर्शन शिवानी मोहुर्ले यांनी केले. तसेच तुषार कडू, हर्षद ढवस, रमेश जीवतोडे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.


