Home चंद्रपुर जिल्हा विशेष ट्रॅक्टरचे ट्रॉली वरून पडून मजुराचा मृत्यू

ट्रॅक्टरचे ट्रॉली वरून पडून मजुराचा मृत्यू

1312

चंद्रपुर : सावरगाव येथील शेतकर्‍याचे धानाचे पोते ट्रॅक्टर मध्ये घेऊन जात असताना ट्रॅक्टर ट्रॉली वर बसलेला युवक खाली पडला. यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवार 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता दरम्यान घडली. देविदास पुंडलिक बोरकर (35) असे मृतक युवकाचे नाव असून तो सावरगाव येथील रहिवासी आहे.

.     सावरगाव येथील ट्रॅक्टर मालक-चालक बाबुराव ऋषी ठिकरे हे स्वतःचे मालकीच्या ट्रॅक्टरने धानाचे पोते शेतावरून घेऊन घराकडे येत असताना चंद्रपूर-नागभीड- नागपूर मार्गावर सावरगाव येथील बॉयपास मार्गाजवळ ट्रॅक्टरला लागून असलेल्या ट्रॉली क्र. एम. एच. 35 एफ 1016 या ट्रालीचा व्हील तुटल्यामुळे पोत्यावर बसलेला युवा शेतमजूर देविदास बोरकर हा ट्रालीच्या खाली पडला. दरम्यान त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

.     घटनेची माहिती मिळतात तळोधी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व शवविच्छेदनाकरिता नागभीड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. अधिक तपास तळोधी पोलीस करीत आहेत. मृतकाच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलें व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

error: Content is protected !!