महिला जखमी
शेतकर्यांत भीतीचे वातावरण
वनविभागाकडून ग्रस्तपथक लावून वाघाला हुसकवण्याचा प्रयत्न
नेरी : चिमुर तालुक्यातील वडसी-गोंदेडा शेतशिवारात मोठया पट्टेदार वाघाचे वावर असून अनेक शेतकऱ्यांना त्याचे दर्शन झाले दोन दिवसापूर्वी शेतावर जात असलेल्या महिलेवर हल्ला करून जखमी केले. अनेकांना वाघ शेतात तसेच गावासभोवताल दिसून येत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. वनविभागाला माहिती मिळताच तात्काळ ट्रप कॅमेरे लावीत ग्रस्तपथक लावून जनतेला सुरक्षा प्रदान करीत आहेत.
. मागील काही दिवसांपूर्वी पासून ताडोबा वाघ्र प्रकल्पातून वाघ हा वडसी गोंदेडा तसेच सभोवतालच्या परिसरातील जंगलात दबा धरून बसला आहे. अनेक गावांत जाऊन शेतकऱ्यांच्या शेतात त्याचे दर्शन झाले. गाई, बैल आणि शेळ्या ची शिकार या वाघाने केली. या वाघाच्या बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने नजर ठेवण्यासाठी वनकर्मचारी नेमले. तसेच फटाके फोडून त्याला हकलण्याचा प्रयत्न केला. मात्र वाघ गेला नाही. परंतु दि 23 ला शेतात जात असलेल्या मंदाडे नामक महिलेवर अचानक वाघाने हल्ला करून तिला जखमी केले. तिने आरडाओरडा करून कशीतरी आपली सुटका केली. सदर घटनेची माहिती वनविभागाला होताच तात्काळ त्या महिलेला उपचारासाठी मदत देण्यात येऊन तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे या परिसरात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तेव्हा वनविभागाचे तळोधी (बा ) चे वनपरिक्षेत्र अधिकारी कन्नमवार यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रसहायक अधिकारी रासेकर यांच्या नेतूत्वात पंधरा वनकर्मचारी ग्रस्तपथक नेमून सदर परिसरात ग्रस्त वाढविली असून नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. वनरक्षक वडझे आणि पाटील यांनी शेतकर्यांना शेतात एकटे न जाता सामूहिक जाण्याचा सल्ला व मार्गदर्शन वनविभागाने केले आहे. सदर वाघावर वनविभागाची करडी नजर असून दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे.


