नेरी : चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागलेल्या चिमुर विधानसभा क्षेत्रात चांगलीच चुरशीची लढत होणार म्हणून पाहिल्या जात होते. मात्र कीर्तीकुमार भांगडिया हे तिसर्यांदा निवडून येत हॅक्ट्रिक मारली.
. चिमुर विधानसभा मतदार संघात भांगडिया यांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली होती तर काँग्रेस पक्षाचे उमेदवार सतीश वारजूकर यांना विजयी करण्यासाठी विपक्ष नेते राहुल गांधी यांनी सुद्धा जोरदार सभा घेतली. त्यातच वारजुकर यांचे पाठीमागे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे सुद्धा खंबीर पणे उभे होते व काँग्रेस मधील गटबाजी संपल्याचे चित्र दिसत असल्याने काँग्रेस ला इथे विजय मिळेल अशी आशा काँग्रेस पदाधिकाऱ्यांना होती.
. मात्र चिमूर क्षेत्रात झालेला विकासाचा झंझावात, चिमूर जिल्ह्या निर्मिती साठी असलेली धडपड, चिमूर नगपरिषद निर्मिती, भिसी, तळोधी तालुका निर्मिती, नेरी नगर पंचायत केलेले प्रयत्न यामुळे बंटी भांगडिया यांना आपला विजय निश्चित करता आला. व त्याच सोबत त्यांना मिळालेली लाडक्या बहिणीची साथ यामुळे बंटी भंगदिया यांना विजय मिळवण्यास यश मिळाले असून तब्बल 9852 मताधिक्याने विजय प्राप्त करून हट्रिक मारली. यामुळे विधानसभेत एकच जल्लोष सुरू आहे.


