Home चंद्रपुर जिल्हा विशेष बल्लारशाह रेल्वे स्थानकावर तार तुटून बोगीवर पडला

बल्लारशाह रेल्वे स्थानकावर तार तुटून बोगीवर पडला

1334

रेल्वे प्रवाशांचा जीव भांड्यात 

रेल्वे प्रशासनाच्या सतर्कतेने दुर्घटना टळली

विसापूर : मध्ये रेल्वेचे दक्षिण भारताचे प्रवेशद्वार म्हणून बल्लारशाह रेल्वे स्टेशन ओळखले जाते. या रेल्वे स्थानकावर प्रत्येक रेल्वेचा थांबा आहे. शुक्रवारी सायंकाळी ७.२0 वाजता मन्नारगुडी ते जोधपूर गाडी क्रमांक २२६७४ ही फलाट एकवर आली. दरम्यान बोगी क्रमांक बी -९ वर ऊच्च दाबाची तार तुटून पडली. यामुळे रेल्वे प्रवाशात भीतीने घाबरगुंडी उडाली. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांची एकच तारांबळ झाली.

.      मन्नारगुडी ते जोधपूर ही प्रवाशी रेल्वे बल्लारशाह रेल्वे स्थानकावर वेळेपूर्वी आल्याची माहिती आहे. रेल्वे क्रमांक २२६७४ या रेल्वे गाडीचे आगमनाची वेळ ७.२0 वाजताची होती. ही रेल्वे फलाट एकवर आली. दरम्यान ध्यानीमनी नसताना उच्च दाबाची वीज तार तुटून ती बोगी क्रमांक ९ पडली. जिवंत वीज तार रेल्वे बोगीवर पडल्यामुळे प्रवाशात भीती निर्माण झाली. प्रवाशांना मोठ्या दुर्घटनेला सामोरे जाण्याची वेळ आली होती. मात्र,रेल्वे प्रशासनाच्या ही बाब वेळीच लक्षात आली. रेल्वे प्रशासनाच्या वीज अभियंता व कर्मचारी वर्गाने ही दुरूस्ती तातडीने केली. यानंतर रेल्वे प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. या दुर्घटनेत कोणालाही ईजा झाली नाही. रेल्वे प्रशासनाच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली. ही भावना रेल्वे प्रवाशांना व्यक्त करत, ही रेल्वे पुढे मार्गस्थ झाली. या प्रकारामुळे रेल्वे प्रशासनाचा गलथानपणा चव्हाट्यावर आला.

error: Content is protected !!